Buldana: रायपूरमध्ये 16 वर्षीय मुलीची डोक्यात दगड घालून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू
बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथे 16 वर्षीय मुलीची डोक्यात दगड घालून हत्या (Murder) करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे रायपूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Buldana: बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथे 16 वर्षीय मुलीची डोक्यात दगड घालून हत्या (Murder) करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे रायपूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने मुलीच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथे शनिवारी रात्री 8 वाजता वीज पुरवठा खंडित झाला होता. यावेळी मृत मुलीचे आई-वडील रुग्णालयात गेलेले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अज्ञात आरोपी मुलीच्या घरात शिरला होता. आरोपीने 16 वर्षाच्या मुलीच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली. यात तिचा जागेवरचं मृत्यू झाला. मृत मुलीचे आई-वडील घरी आल्यानंतर त्यांनी मुलीचा मृचदेह शौचालयाजवळ पडलेला पाहिला. मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी हंबरडा फोडला. (हेही वाचा -Yeola Manmad Road Accident: येवला-मनमाड रोडवर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर जखमी)
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. मुलीच्या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून मृत मुलीच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, शनिवारी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नीचा मृतदेह अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात आढळला होता. गौरी प्रशांत गडाख असं त्यांचं नाव होतं. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Nov 08, 2020 11:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

