Blood Donation In Maharashtra: कौतुकास्पद! गेल्या पाच वर्षांत राज्यात रक्तदानात 16 टक्के वाढ

1868 मध्ये जन्मलेल्या कार्ल लँडस्टेनरचा जन्मदिवस 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. एबीओ रक्तगट प्रणालीच्या शोधासाठी लँडस्टेनर यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यानुसार लोकांचे ‘ए’, ‘बी’, ‘एबी’ आणि ‘ओ’ रक्तगटांमध्ये वर्गीकरण केले जाते. जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी एसबीटीसी महाराष्ट्रातील 27 रक्तपेढ्यांना प्रत्येकी 25,000 रुपये देणार आहे.

Blood Donation (Photo Credits: Pixabay)

Blood Donation In Maharashtra: गेल्या पाच वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात रक्तसंकलनात 16% वाढ झाली आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) प्रदान केलेल्या आकडेवारीनुसार, 2018 मध्ये 16.56 लाख युनिट रक्त संकलित करण्यात आले होते, जे 2022 मध्ये 19.28 लाख युनिट्सवर पोहोचले आहे. आकडेवारीनुसार, गेल्या पाचमध्ये ऐच्छिक रक्तदात्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. एका वर्षात गोळा केलेल्या एकूण रक्तापैकी 99% लोकांनी स्वेच्छेने रक्त दान केलं.

वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, साथीच्या रोगानंतर रक्तदान करणाऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली असून लोक रक्तदान करण्यासाठी पुढे येत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही रक्तपेढ्यांना नेहमीच रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी रक्तदान मोहीम आयोजित करण्याचे निर्देश देतो. गेल्या वर्षीची मागणी लक्षात घेऊन 10 ते 15% अतिरिक्त रक्त ठेवणं आवश्यक आहे. (हेही वाचा -Elevated Corridor On Western Express Highway: वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील प्रवाशांची होणार वाहतूककोंडीपासून सुटका; BMC महामार्गावर उभारणार 5,500 कोटी रुपये खर्चून 15 किमीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर)

दरम्यान, 1868 मध्ये जन्मलेल्या कार्ल लँडस्टेनरचा जन्मदिवस 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. एबीओ रक्तगट प्रणालीच्या शोधासाठी लँडस्टेनर यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यानुसार लोकांचे ‘ए’, ‘बी’, ‘एबी’ आणि ‘ओ’ रक्तगटांमध्ये वर्गीकरण केले जाते. जागतिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी एसबीटीसी महाराष्ट्रातील 27 रक्तपेढ्यांना प्रत्येकी 25,000 रुपये देणार आहे. यामुळे ऐच्छिक रक्तदात्यांचा डेटाबेस तयार करण्यात मदत होईल जेणेकरून रक्ताचा तुटवडा भासल्यास त्यांना रक्तपेढ्यांकडून कॉल करता येईल.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारने रक्तदाता दिन साजरा करण्यासाठी विविध मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. भारत आणि शेजारील देश (बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि भूतान) चे वैद्यकीय आणि वैज्ञानिक व्यवहार प्रमुख डॉ. संदीप सेवलीकर यांनी सांगितलं की, रक्तदान हे जीवघेण्या परिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितींचा सामना करणार्‍या असंख्य व्यक्तींसाठी जीवनरेखा म्हणून काम करते. हे निःस्वार्थ आणि करुणेचे दान आहे. रक्तदानामध्ये जीव वाचवण्याची शक्ती आहे. तथापि, दान केलेल्या रक्ताची सुरक्षितता सुनिश्चित करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.