Mumbai Rain Update: आजपासून पुढील 48 तास मुंबई सह राज्यात विजांसह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

हवामान खात्याचे प्रमुख के.एस. होसाळीकर (K.S.Hosalikar) यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली.

Monsoon 2020 | File Image

Maharashtra Monsoon 2020 Update: मुंबई (Mumbai) सह राज्यभरात कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. वास्तविक यंदा निसर्ग चक्रीवादळाच्या (Cyclone Nisarga) पार्श्वभुमीवर जुनच्या पहिल्याच आठवड्यात मुंंबईत पावसाचे आगमन झाले होते, मात्र मधल्या एक आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांंती घेतली होती, काल मात्र पुन्हा एकदा मुंंबई शहर व उपनगरात पावसाने हजेरी लावली. आज म्हणजेच 16 जुन रोजी सुद्धा मुंबईत विजांच्या कडकडाटासह अधिक मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याचे प्रमुख के.एस. होसाळीकर  (K.S.Hosalikar) यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली. आजपासुन पुढील 48 तास मुंंबई सह ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), पालघर (Palghar), रायगड (Raigad) , रत्नागिरी (Ratnagiri) ,सिंधुदुर्ग (Sindhudurg) या भागात जोरदार पाउस होईल असा अंंदाज असल्याने रेड ते ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय राज्यातही अनेक ठिकाणी पावसाला अनुकुल परिस्थिती असल्याने आज मान्सुन संपुर्ण राज्य कव्हर करेल असे सांगण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच आयएमडीने महिन्याभरासाठी अपेक्षित असलेल्या 50 टक्के पावसाची नोंद केली आहे, आयएमडीच्या सांताक्रूझ वेधशाळेमध्ये सोमवारपर्यंत 245.5 मिमी नोंद झाली होती आणि महिन्यासाठी आवश्यक पाऊस 493.1 मिमी आहे. तर दुसरीकडे राज्यात आतापर्यंत 386.22  मिमी पावसाची नोंद झाली आहे. Happy Monsoon 2020 Wishes: 'मान्सून सीझन' चं स्वागत करणारी खास मराठमोळी ग्रिटिंग्स, HD Images ,GIFs, Messages शेअर करून जल्लोषात करा पावसाळ्याचं स्वागत!

K. S. Hosalikar ट्विट

दरम्यान, येत्या दोन दिवसात राज्यात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. अरबी समुद्रातून नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या प्रवाहामुळे पुढील ४८ तास महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, व उत्तर प्रदेशच्या काही भागात सुद्धा पाऊस होऊ शकतो.