Coronavirus in Maharashtra: कोरोना व्हायरसचे तुमच्या जिल्ह्यात किती आहेत रुग्ण; जाणून घ्या महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आकडेवारी

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (15 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

Covid 19 (Photo Credit Twitter)

महाराष्ट्रात कोविड-19 (COVID-19) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून बरे होणा-या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. राज्यात काल (15 ऑगस्ट) 12, 614 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 84 हजार 754 वर पोहोचला आहे. सध्या राज्यात 1 लाख 56 हजार 409 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 4 लाख 08 हजार 286 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली आहे अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) दिली आहे.

दुर्देवाची बाब म्हणजे आतापर्यंत राज्यातील 19 हजार 749 रुग्णांची कोरोनाविरुद्धची झुंज अयशस्वी ठरली आहे अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. Coronavirus Cases In Pune: पुणे शहरात आज नव्याने 1,073 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 1145 रुग्णांना डिस्चार्ज

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (15 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
अहमदनगर 3615 129 8778 12522
अकोला 518 137 2573 3229
अमरावती 1100 95 2247 3442
औरंगाबाद 5762 570 12001 18333
बीड 1721 58 765 2544
भंडारा 174 4 314 492
बुलढाणा 892 61 1349 2302
चंद्रपूर 455 6 557 1018
धुळे 1708 144 3280 5134
गडचिरोली 129 2 382 513
गोंदिया 309 9 449 767
हिंगोली 308 22 648 978
जळगाव 4863 674 11802 17339
जालना 1120 113 1769 3002
कोल्हापूर 6776 339 6269 13384
लातूर 2540 188 2254 4982
मुंबई 17581 7086 102749 127716
नागपूर 7802 344 4726 12873
नांदेड 1977 134 1716 3827
नंदुरबार 369 53 754 1176
नाशिक 9066 660 15936 25662
उस्मानाबाद 1680 90 1662 3432
इतर राज्ये 479 59 0 538
पालघर 6293 496 14046 20835
परभणी 809 51 531 1391
पुणे 41080 3130 83308 127518
रायगड 5110 572 17320 23004
रत्नागिरी 1072 100 1582 2754
सांगली 2393 196 3491 6080
सातारा 2662 216 4309 7188
सिंधुदुर्ग 152 12 408 572
सोलापूर 5076 620 8336 14033
ठाणे 19542 3300 89795 112638
वर्धा 142 10 211 364
वाशिम 412 21 730 1163
यवतमाळ 722 48 1239 2009
एकूण 156409 19749 408286 584754

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.82 टक्के आहे. तसेच कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचा दर 3.38 टक्के इतका आहे. याशिवाय राज्यात सध्या 10 लाखाहून अधिक जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तसेच 37 हजार पेक्षा जास्त जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

तर भारतात कोरोना बाधितांचा आकडा 25 लाख 26 हजार 193 वर पोहचला आहे. यापैकी 6 लाख 68 हजार 220 सक्रीय रुग्ण (Active Cases) आहेत. तर 18 लाख 08 हजार 937 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान कोरोना संसर्गामुळे एकूण 49 हजार 036 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health and Family Welfare) देण्यात आली आहे.