Pune Shocker: धक्कादायक! राजगुरुनगर मधील शाळेत 15 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

स्नेहा ही खेड तालुक्यातील (Khed Taluka) होलेवाडी येथील रहिवाशी होती. ती नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत आली होती. तसेच ती शाळेत ‘स्नेह संमेलना’साठी आयोजित केलेल्या व्याख्यानात सहभागी झाली होती. सकाळी 10 च्या सुमारास तिला अस्वस्थ वाटू लागले.

Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

Pune Shocker: राजगुरुनगर (Rajgurunagar) येथील महात्मा गांधी शाळेत (Mahatma Gandhi School) नववीत शिकणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थिनीचा बुधवारी 18 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला. स्नेहा एकनाथ होले असं या मृत मुलीचं नाव आहे. स्नेहा ही खेड तालुक्यातील (Khed Taluka) होलेवाडी येथील रहिवाशी होती. ती नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत आली होती. तसेच ती शाळेत ‘स्नेह संमेलना’साठी आयोजित केलेल्या व्याख्यानात सहभागी झाली होती. सकाळी 10 च्या सुमारास तिला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर काही वेळातचं तिला चक्कर आली.

शिक्षकांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, कोणताही उपचार होण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. स्नेहाच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने मुलीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (हेही वाचा -Cricketer Dies by Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू)

7 वर्षीय मुलीचा शाळेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू -

गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली होती. येथे सरूरपूर येथील योगीनाथ विद्यापीठ पब्लिक स्कूलमध्ये पहिली इयत्तेत शिकणाऱ्या अपेक्षा कुमारी नावाच्या 7 वर्षीय मुलीचा शाळेच्या मैदानात खेळताना कोसळून मृत्यू झाला. शिक्षकांनी सांगितले की, ती अचानक बेशुद्ध पडली आणि तिला तातडीने तीन वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, तिला बदाऊत रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा - Passenger Suffers Heart Attack On Delhi-Mumbai IndiGo Flight: दिल्ली-मुंबई फ्लाईटमध्ये प्रवाशाला हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांनी वाचवला जीव)

दरम्यान, प्राथमिक अहवालानुसार, अपेक्षाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. अपेक्षा ही निरोगी आणि सक्रिय मुलगी होती. या घटनेनंतर, पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. पोलिस तिच्या आकस्मिक मृत्यूमागील कारण जाणून घेण्यासाठी अधिक तपास करत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif