Cricketer Dies by Heart Attack: मुंबईतील एका तरूणाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack)आल्याने मृत्यू झाला. मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) ही घटना घडली. विक्रम अशोक देशमुख असे मृत तरूणाचे नाव असून तो व्यवसायाने अभियंता होता. विक्रम एका आयटी कंपनीत कामाला होता. तो अनेकदा आझाद मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी येत (Cricketer Dies by Heart Attack) असे. आजही तो क्रिकेट खेळण्यासाठी आला होता. (Cricketer Heart Attack: सुरतमध्ये क्रिकेट खेळत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने 32 वर्षीय खेळाडूचा झाला मृत्यू)
विक्रम अशोक देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते आझाद मैदानावर 25 षटकांचा सराव सामना खेळत होते. त्यांचा संघ 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. जास्त धावा करत त्यांनी संघाला विजयाच्या जवळ आणले. मात्र, त्यांच्या थकव्यामुळे हृदयावर भार पडला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. (Telangana: क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचा मृत्यू, घटनेत होत आहे सतत वाढ)
10 व्या षटकात विक्रमला पहिल्यांदा छातीत दुखू लागलं होतं. पण पुढची सहा षटके तो खेळत राहिला. 17 व्या षटकात एक धाव पूर्ण केल्यानंतर तो अचानक जमिनीवर पडला. विक्रमला उचलून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर आझाद मैदान पोलिसांनी एडीआरची नोंद करून तपास सुरू केला आहे.