महाराष्ट्र: जळगाव जिल्ह्यातील किनगावाजवळ भीषण अपघात, ट्रक पलटी होऊन 15 जणांचा मृत्यू, 2 जण जखमी

रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

Accident Representational image (PC - PTI)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किंगगावजवळ काल (14 फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघतात आयशर ट्रक उलटून त्यात 15 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघाताने या परिसरात एकच खळबळ उडाली. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, किनगावजवळ हा भीषण अपघात झाला आहे. रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक धुळे येथून चोपडा मार्गे रावेरला जात होता. मध्यरात्रीच्या सुमारास हा ट्रक पलटी झाला. यात 15 जण जागीच ठार झाले असून 2 जण जखमी आहे. मृतांमध्ये 2 चिमुकल्यांचाही समावेश आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Weather Forecast: विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 16-18 फेब्रुवारी दरम्यान वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

दरम्यान काल (14 फेब्रुवारी) नांदेड येथील शिवशाही बसला भीषण अपघात (Shivshahi Bus Accident) झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ही घटना तेलंगाणा (Telangana) राज्यातील कामारेड्डी (Kamareddy) येथे पहाटे घडली आहे. या बसमध्ये वाहन चालक आणि वाहनवाहक यांच्यासह एकूण 38 प्रवासी होते. त्यापैकी 17 जण गंभीर झाले आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाचे बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्यावरुन पलटल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर, बसमधील वाहकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.