मुंबईकरांसाठी खुशखबर! आता धावणार १५ डब्यांच्या लोकल
त्यातून सुमारे ५,५०० प्रवासी दैनंदिन प्रवास करतात. खरेतर रेल्वेची नियमानूसार ३००० प्रवासी वाहण्याचीच क्षमता असते. मात्र, प्रचंड गर्दीमुळे ही क्षमता ओलांडून अधिक प्रवाशांची वाहतूक केली जाते.
15-coach local train will run in Mumbai: लोकल ट्रेनमध्ये चढताना होणारी गर्दी, त्यामुळे होणारी धक्काबुक्की, वाद-विवाद आणि अनेक वेळा होणारे अपघात हाच मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अनुभव. या अनुभवातून अल्पशी सूटका होत मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे. लवकरच मुंबईच्या सर्व रेल्वेमार्गांवरून १५ डब्यांच्या लोकल धावणार आहेत. रेल्वेमंत्री पीयूश गोलय यांनीच ही घोषणा केली आहे. लोकलच्या डब्यांमध्ये वाढ केल्याने मुंबई रेल्वेची कार्यक्षमता २५ टक्क्यांनी सुधारणार असल्याचेही गोयल म्हणाले.
आजघडीला मुंबईच्या रेल्वेमार्गावरून १२ डब्यांच्या लोकल धावतात. त्यातून सुमारे ५,५०० प्रवासी दैनंदिन प्रवास करतात. खरेतर रेल्वेची नियमानूसार ३००० प्रवासी वाहण्याचीच क्षमता असते. मात्र, प्रचंड गर्दीमुळे ही क्षमता ओलांडून अधिक प्रवाशांची वाहतूक केली जाते. पंधरा (15)डब्यांच्या लोकलमुळे तब्बल ४,२०० प्रवासांना प्रवास करता येणार आहे. तसेच, गर्दीच्या वेळी हीच क्षमता ७००० प्रवाशांपर्यंत पोहोचू शकते. (हेही वाचा, मुंबईकर कष्टकरी, घेतात कमी सुट्ट्या - सर्व्हे अहवाल)
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे असे मुंबईत एकूण प्रमुख तीन रेल्वे मार्ग आहेत. दरम्यान, ट्रान्सहार्बरसारखे काही एकदोन छोटे रेल्वेमार्गही आहेत. मात्र, या तिनही मार्गांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असल्याने रेल्वेवर त्याचा प्रचंड ताण येतो. परिणामी, रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणे, रेल्वे उशीरा धावणे, अपघातांचे प्रमाण वाढणे, प्रवाशांत ताण-तणावाचे प्रसंग येणे असे प्रकार घडतात. त्यामुळे १५ डब्यांचील लोकल धावल्यास हे चित्र काही अंशी तरी बदलण्याची शक्यता आहे.