Coronavirus Updats In Maharashtra: महाराष्ट्रात आज 14,361 नवे कोरोना संक्रमित रुग्ण, तर 331 जणांचा मृत्यू

आज राज्यात 14,361 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 331 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 7 लाख 47 हजार 995 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 1 लाख 80,718 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 5 लाख 43 हजार 170 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय आतापर्यंत 23 हजार 775 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने (State Health Department) माहिती दिली आहे.

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

Coronavirus Updats In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा कहर माजला आहे. आज राज्यात 14,361 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 331 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 7 लाख 47 हजार 995 इतकी झाली आहे. सध्या राज्यात 1 लाख 80,718 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 5 लाख 43 हजार 170 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय आतापर्यंत 23 हजार 775 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने (State Health Department) माहिती दिली आहे.

दरम्यान, राज्यात आज 11 हजार 607 रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.62 टक्के झाले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 39 लाख 32 हजार 522 नमुन्यांपैकी 7 लाख 47 हजार 995 नमुने पॉझिटिव्ह (19.02 टक्के) आले आहेत. राज्यात 13 लाख 01 हजार 346 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 34 हजार 908 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 331 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.18 टक्के एवढा आहे. (हेही वाचा - कोरोना विषाणू संदर्भातील नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध धडकपणे कारवाई करा; अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश)

दरम्यान, भारतातदेखील कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात मागील 24 तासांत 77,266 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच 1,057 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 33,87,501 वर पोहचला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 61,529 मृतांची नोंद करण्यात आली आहे. सध्या देशात 7,42,023 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif