Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 3827 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह तर 142 जणांचा मृत्यू

Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) आज 3827 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 124331 अशी झाली आहे. आज नवीन 1935 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 55651 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात (Maharashtra) आज 3827 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 124331 अशी झाली आहे. आज नवीन 1935 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 55651 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे.

राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबईमध्ये आढळून येत आहे. आज मुंबईत 114 जणांचा मृत्यू झाला असून 1269 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 64,068 वर पोहोचली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे. याशिवाय आज मुंबईतील धारावीत 17 जणांना कोविड-19 ची लागण झाली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 2151 वर पोहोचला आहे. (हेही वाचा - धारावीत आज 17 नवे कोरोना रुग्ण; एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 2151 वर पोहोचला)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात आतापर्यंत पाच वेळा लॉकडाऊन पाळण्यात आले आहे. लॉकडाऊन 5.0 मध्ये सरकारने अनेक अटींमध्ये शिथिलता दिली आहे. परंतु, गेल्या आठवड्यापासून राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now