मुंबई मध्ये काल दिवसभरात विना मास्क फिरणा-या लोकांकडून 28.20 लाखांचा दंड वसूल- BMC
मुंबई महानगरपालिकेच्या या धडक कारवाईत 21 फेब्रुवारीपर्यंत 16 लाख 2 हजार 536 लोकांकडून 32 कोटी 41 लाख 14 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे अशी माहिती BMC ने दिली आहे
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधताना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे अशी माहिती दिली आहे. त्यामुळे मास्क (Mask) घालणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे या नियमांचे पालन होत आहे की नाही यावर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. याचाच भाग मुंबई महानगरपालिकेने (BMC) सुरु केलेल्या धडक कारवाईत काल (21 फेब्रुवारी) दिवसभरात मुंबईत विनामास्क रस्त्यांवर फिरणा-या 14,100 लोकांकडून 28.20 लाखांचा दंड वसूल केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या या धडक कारवाईत 21 फेब्रुवारीपर्यंत 16 लाख 2 हजार 536 लोकांकडून 32 कोटी 41 लाख 14 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे अशी माहिती BMC ने दिली आहे.हेदेखील वाचा- COVID-19 Surge in Maharashtra: मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून मुंबई पोलिसांनी आकारला दंड
दरम्यान मुंबईत मागील 24 तासांत 760 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 3,19,888 वर पोहोचली आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. तसेच आज दिवसभरात 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 11,446 वर पोहोचली आहे.
आजपासून राज्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, मोर्चांवर काही दिवसांकरिता बंदी घालण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच "राज्यात लॉकडाऊन हवे की नको ही गोष्ट मी पूर्णपणे जनतेवर सोडले असून पुढील आठ दिवसांत मला त्यांच्याकडून कळेल" असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधताना म्हणाले.