Coronavirus Update: मुंबई, पुणे, ठाणे सह महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण आहेत जाणून घ्या

महाराष्ट्रात मागील 24 तासात 6,497 ,कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, यानुसार राज्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2,60,924 वर पोहचली आहे.तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत किती जण बरे झाले आहेत आणि कितींचा मृत्यू झाला आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

Coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात मागील 24 तासात 6,497 ,कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, यातील 4,182 जणांना कालच्या दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला असून 193 मृत्यूंची नोंद झाली होती. यानुसार राज्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2,60,924 वर पोहचली आहे.आजवर 1,44,507 जणांनी कोरोनवर मात केली असून 10,482 जणांचा या जीवघेण्या विषाणूने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. काल मुंबई मध्ये सुद्धा कोरोनाचे 1174 नवे रुग्ण आणि 47 मृत्यू नोंदवले गेले होते, यानुसार एकट्या मुंबई शहरातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखाचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. रायगड, पुणे, औरंगाबाद, ठाणे येथे सुद्धा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. अशा वेळी तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत किती जण बरे झाले आहेत आणि कितींचा मृत्यू झाला आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

Coronavirus: भारत या आठवड्यात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णसंख्येत 10 लाखांचा टप्पा पार करेल- राहुल गांधी

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी (14 जुलै)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 94,146 5335
2 ठाणे 8656 164
3 ठाणे मनपा 15,110 582
4 नवी मुंबई मनपा 11,085 295
5 कल्याण डोंबिवली मनपा 15,105 217
6 उल्हासनगर मनपा 4615 75
7 भिवंडी निजामपूर मनपा 3024 174
8 मीरा भाईंदर 6183 198
9 पालघर 1896 22
10 वसई विरार मनपा 8182 172
11 रायगड 4457 63
12 पनवेल मनपा 4408 101
ठाणे मंडळ एकूण 1,76,867 7398
1 नाशिक 1717 72
2 नाशिक मनपा 4399 143
3 मालेगाव मनपा 1200 85
4 अहमदनगर 550 19
5 अहमदनगर मनपा 344 3
6 धुळे 785 44
7 धुळे मनपा 738 34
8 जळगाव 4618 291
9 जळगाव मनपा 1412 62
10 नंदुरबार 279 11
नाशिक मंडळ एकूण 16,042 764
1 पुणे 3753 107
2 पुणे मनपा 29,612 897
3 पिंप्री-चिंचवड मनपा 6815 123
4 सोलापूर 902 36
5 सोलापूर मनपा 3411 315
6 सातारा 1780 68
पुणे मंडळ एकुण 46,273 1546
1 कोल्हापूर 1122 20
2 कोल्हापूर मनपा 98 0
3 सांगली 521 13
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 101 5
5 सिंधुदुर्ग 262 5
6 रत्नागिरी 884 30
कोल्हापूर मंडळ एकुण 2988 73
1 औरंगाबाद 1978 37
2 औरंगाबाद मनप 6454 304
3 जालना 1083 47
4 हिंगोली 342 2
5 परभणी 117 5
6 परभणी मनपा 97 0
औरंगाबाद मंडळ एकूण 10071 395
1 लातूर 427 26
2 लातूर मनपा 292 9
3 उस्मानाबाद 395 17
4 बीड 235 5
5 नांदेड 211 8
6 नांदेड मनपा 395 16
लातूर मंडळ एकूण 1955 81
1 अकोला 378 23
2 अकोला मनपा 1498 71
3 अमरावती 108 8
4 अमवरावती मनपा 750 29
5 यवतमाळ 448 14
6 बुलढाणा 411 16
7 वाशीम 195 5
अकोला मंडळ एकूण 3788 166 
1 नागपूर 294 3
2 नागपूर मनपा 1740 19
3 वर्धा 34 1
4 भंडारा 162 1
5 गोंदिया 216 3
6 चंद्रपूर 136 0
7 चंद्रपूर मनपा 41 0
8 गडचिरोली 115 1
नागपूर मंडळ एकूण 2738 28
इतर राज्य 202 31
एकूण 2,60,924 10482

दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. पुण्यात हा आठवडा लॉक डाऊन असणार आहे तर रायगड मध्ये 15 ते 24 जुलै दरम्यान कडकडीत बंद पाळला जाईल. लातूर मध्ये उद्यापासून 30 जुलै पर्यंत लॉक डाऊन असणार आहे. याशिवाय महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा पालिका आयुक्तांकडून लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहेत. मुमबीत मात्र 100 टक्के लॉक डाऊन ची आवश्यकता नाही अशी भूमिका बीएमसी आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मांडली आहे.