Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरीसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण?

तर आतापर्यंत 19,063 रुग्णांची रुग्णांची कोरोनाविरुद्धची झुंज अयशस्वी ठरली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

Coronavirus In Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून काल (13 ऑगस्ट) दिवसभरात राज्यात 11 हजार 813 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) आली असून 413 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 5 लाख 60 हजार 126 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 19,063 रुग्णांची रुग्णांची कोरोनाविरुद्धची झुंज अयशस्वी ठरली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. काल दिवसभरात 9 हजार 115 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3 लाख 90 हजार 958 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 1 लाख 49 हजार 798 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) माहिती दिली आहे.

दरम्यान, राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 69.8 टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचा दर 3.4 टक्के इतका आहे. आज मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 10 लाखाहून अधिक जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,200 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,27,571 वर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (13 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
अहमदनगर 3536 123 7902 11561
अकोला 467 134 2534 3136
अमरावती 940 92 2169 3201
औरंगाबाद 5325 557 11649 17531
बीड 1672 44 637 2353
भंडारा 166 3 274 443
बुलढाणा 772 57 1281 2110
चंद्रपूर 450 4 478 932
धुळे 1346 138 2975 4461
गडचिरोली 134 2 354 490
गोंदिया 283 8 422 713
हिंगोली 251 21 623 895
जळगाव 4620 654 11004 16278
जालना 1018 102 1733 2853
कोल्हापूर 6071 312 5630 12013
लातूर 2374 180 2074 4628
मुंबई 19314 6991 100954 127556
नागपूर 6727 307 4116 11151
नांदेड 1827 129 1589 3545
नंदुरबार 365 51 672 1088
नाशिक 7829 631 15043 23503
उस्मानाबाद 1565 82 1418 3065
इतर राज्ये 528 58 0 586
पालघर 5660 466 13771 19897
परभणी 735 50 505 1290
पुणे 40225 2957 78838 122020
रायगड 4616 554 16641 21813
रत्नागिरी 821 92 1536 2449
सांगली 2297 169 2955 5421
सातारा 2213 206 4132 6552
सिंधुदुर्ग 148 10 378 536
सोलापूर 4858 611 7685 13155
ठाणे 19589 3190 86923 109703
वर्धा 100 10 207 318
वाशिम 321 20 706 1047
यवतमाळ 635 48 1150 1833
एकूण 149798 19063 390958 560126

मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, औरंगाबाद आदी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 23,96,638 वर पोहोचली असून 47,033 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.देशात सद्य घडीला 6,53,622 रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 16,95,982 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात करुन कोरोनाला हरवले आहे.