Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज 1,311 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 84,125 वर
अशाप्रकारे मुंबईमधील एकूण रुग्णांची संख्या 84,125 झाली आहे. आज शहरात 932 संशयित रुग्णांची भरती झाली आहे.
राज्याची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये आज 1,311 कोरोना विषाणू (Coronavirus) बाधित रुग्णांची नोंद व 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे मुंबईमधील एकूण रुग्णांची संख्या 84,125 झाली आहे. आज शहरात 932 संशयित रुग्णांची भरती झाली आहे. आज शहरामध्ये 2,420 रुग्ण बरे झाले आहेत, अशाप्रकारे मुंबईमधील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 55,883 झाली आहे. आजचे 69 मृत्यू हे गेल्या 48 तासांमधील आहेत. यासह आजपर्यंत शहरात 4,896 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 61 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 42 रुग्ण पुरुष व 27 रुग्ण महिला होत्या.
एएनआय ट्वीट-
मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 4 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 43 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 22 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. विविध ही माहिती रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि प्रमाणित लॅबद्वारे आयसीएमआर पोर्टलवर अपलोड केलेली माहितीनुसार आहे. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 66 टक्के आहे. 28 जून ते 4 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.63 टक्के आहे. 4 जुलै 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 3,54,649 इतक्या आहेत, तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 43 दिवस आहे.
(हेही वाचा: पालघर येथे गेल्या 24 तासात आणखी 277 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 7 हजारांच्या पार
मुंबईमधील संशयितांसाठी कोविड-19 ची चाचणी सहज उपलब्ध व्हावी यासाठी, महानगर पालिकेने गेल्या आठवड्यात युनिवर्सल टेस्टिंग पॉलिसी सुरू केली आहे. यासाठी आईसीएमआरने मंजूर केलेल्या 1 लाख रॅपिड अॅटीजेन किटची खरेदी केली आहे. ही चाचणी सर्व लक्षणे असलेल्या कोविड-19 संशयीतांसाठी व लक्षणे नसलेले अति जोखमीचे संपर्क, ज्यांना दीर्घकालीन आजार आहेत यांसाठी सुचविली जाते. सदर चाचणी ही सध्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयीन रूग्णालये व प्रतिबंधात्मक क्षेत्र येथे घेण्यात येईल. लक्षणे असलेल्या कोविड-19 संशयीतांचा अहवाल जर निगेटिव आल्यास त्यांचा दूसरा नमूना घेतला जाईल व RTPCR चाचणी साठी पाठविला जाईल. यासाठी आत्तापर्यंत 724 नमुने घेतेले गेले आहेत)