Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, रत्नागिरीसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतील कोरोना बाधितांची एकूण संख्या किती? जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,54,427 इतकी झाली आहे. आतापर्यंत राज्यात 1,40,325 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु, दुर्देवाने 10,289 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात आलेल्या आणि वा-याच्या वेगाने राज्यात पसरत जाणा-या कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या महाभयाण विषाणूला राज्यातून पळवून लावण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणासह कोविड योद्धा (COVID Warriors) अथक परिश्रम घेत आहेत. नागरिकही संयम बाळगून गेले 4 महिने घरात राहून सोशल डिस्टंसिंगचे पालन करत आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात (Maharashtra) 7,827 नवे कोरोना रुग्ण आढळून आहे आहेत. तर दिवसभरात 173 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,54,427 इतकी झाली आहे. आतापर्यंत राज्यात 1,40,325 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु, दुर्देवाने 10,289 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत (Mumbai) असून त्यापाठोपाठ ठाणे (Thane), पुणे (Pune), पालघर (Palghar) मध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आतापर्यंत 92 हजार 720 रुग्ण आढळले आहेत. ठाण्यात 61,869 तर पुण्यात 39,125 रुग्ण आढळले आहेत.

हेदेखील वाचा- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी (12-13 जुलै)

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 92988 5288 64872
ठाणे 61869 1646 26489
पुणे 39125 1097 16427
पालघर 9744 188 4817
औरंगाबाद 8459 159 3731
रायगड 8217 338 4042
नाशिक 7080 290 3847
जळगाव 5810 345 3336
सोलापूर 3978 344 2076
नागपूर 2022 21 1366
अकोला 1875 92 1468
सातारा 1709 68 981
धूळे 1517 76 835
कोल्हापूर 1123 20 807
जालना 983 47 506
रत्नागिरी 870 30 601
अमरावती 848 20 524
अहमदनगर 823 36 613
सांगली 664 33 325
लातुर 597 15 330
नांदेड 572 24 251
यवतमाळ 424 14 280
बुलडाणा 399 16 206
हिंगोली 381 14 234
उस्मानाबाद 341 2 276
सिंधुदुर्ग 279 11 149
नंदुरबार 257 5 205
गोंदिया 220 5 105
बीड 210 3 156
अन्य जिल्हे 200 5 101
परभणी 195 31 0
वाशिम 173 4 104
चंद्रपूर 164 0 96
भंडारा 162 0 89
गडचिरोली 115 1 66
वर्धा 34 1 14
एकुण 254427 10289 140325

सध्या महाराष्ट्रात रिकव्हरी रेट 55.15 टक्के इतका आहे. याशिवाय 6 लाखांपेक्षा अधिक लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबई शहरात आढळून येत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या आकड्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now