3 वर्षीय अल्पवयीन मुलाचे 12 वर्षीय मुलाकडून लैंगिक शोषण,आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद

सुशिक्षित कुटुंबातील मुलाने 3 वर्षीय अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Picture Credits: ANI)

सुशिक्षित कुटुंबातील मुलाने 3 वर्षीय अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या घरातील मंडळींनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी मुलाने यापूर्वी ही पीडित मुलाचे लैंगिक शोषण केले होते.

पुण्यामध्ये राहणाऱ्या 12 वर्षीय मुलांच्या ग्रुपमध्ये 3 वर्षांचा अल्पवयीन मुलगा नियमितपणे खेळण्यास जात असे. तर या पीडित मुलाला गार्डनमध्ये घेऊन जाऊन त्याच्यावर आरोपीने लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी आरोपी मुलाची तक्रार त्याच्या पालकांना करण्यात आली होती. त्यावेळी पालकांनी असे पुन्हा आमच्या मुलाकडून ही चुक होणार नसल्याचे आश्वासन पीडित मुलाच्या घरच्या मंडळींना दिले होते. मात्र त्यानंतरही या आरोपी मुलाने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार सुरु ठेवले होते.

या प्रकरणी आरोपी मुलाच्या मित्रांनीच पुन्हा पीडित तरुणाच्या घरच्या मंडळींना घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर संतप्त झालेल्या पीडित अल्पवयीन मुलाच्या घरातील मंडीळींनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपी मुलाविरुद्ध अनैसर्गिक संभोग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.