Mumbai Food Poisoning: मुंबईत गोरेगांवमध्ये चिकन शोर्मा खाऊन अनेकांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

गोरेगाव पूर्वेकडील संतोष नगर येथील गोल्डन बार समोर सॅटॅलाइट टॉवर येथे चिकन शर्मा खाल्ल्यामुळे एकूण बारा जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

Pic Credit - Pixabay

मुंबईतील गोरेगांव इथे एक घक्कादायक घटना घडली आहे. गोरेगांव पूर्व परिसरातील चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. गोरेगाव पूर्वेकडील संतोषनगरमध्ये ही घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या सर्व जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात विभागात विषबाधा झालेल्यांवर उपचार सुरू असल्याचं सांगणात येत आहे. यामधील 9 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला आहे. तर तीन जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. स्वप्निल डहाणूकर, मुस्ताक अहमद आणि सुजित जयस्वाल या तिघांची प्रकृती अस्थिर आहे, असं सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Rat Inside Domino's Pizza Shop in Mumbai: डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेट ओव्हनमध्ये उंदरांचा सुळसुळाट; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर (Watch Video))

गोरेगाव पूर्वेकडील संतोष नगर येथील गोल्डन बार समोर सॅटॅलाइट टॉवर येथे चिकन शर्मा खाल्ल्यामुळे एकूण बारा जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या सर्व विषबाधा झालेल्या व्यक्तींना गोरेगाव परिसरातील एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या संदर्भातली माहिती रुग्णालयातील डॉक्टर मिश्रा यांनी पोलिसांना कळवली आहे.

27 एप्रिल दिवशी अजून दोन जणांना त्रास जाणू लागल्यामुळे त्यांना देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार करून यातील नऊ जणांना आता रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून अजूनही तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif