Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित आहेत जाणून घ्या एका क्लिक वर (List Inside)

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2,46,600 वर पोहचला आहे. त्यापैकी 99,202 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1,36,985 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती ऍक्टिव्ह, डिस्चार्जड आणि मृत रुग्ण आजवर नोंदवले गेलेत याची माहिती जाणून घेण्यासाठी आत दिलेला तक्ता पहा.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात 8139 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 4360 जणांची प्रकृती सुधारुन डिस्चार्ज देण्यात आला असून 223 जणांचा बळी गेला आहे. यानुसार सद्य घडीला राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2,46,600 वर पोहचला आहे. त्यापैकी 99,202 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1,36,985 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकूण 10,116 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या संदर्भात आरोग्य मंत्रालयातून माहिती देण्यात आली. राज्यात मुंबई (Mumbai)  सह आता पुणे (Pune), औरंगाबाद (Aurangabad), ठाणे (Thane) या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील संपूर्ण आठवडा जिल्हाबंदीचे आदेश दिले आहेत. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती ऍक्टिव्ह, डिस्चार्जड आणि मृत रुग्ण आजवर नोंदवले गेलेत याची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला तक्ता पहा. धारावीत COVID19 वर मिळवलेले नियंत्रण हे जगासाठी प्रेरणादायी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार, राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा सध्या 55.55 टक्के असून त्या तुलनेने मृत्युदर हा 4.1 % इतकाच आहे. धारावी (Dharavi) सारख्या कोरोनाच्या हॉटस्पॉटने आता जवळपास या विषाणूंवर मात केली असल्याने लवकरच राज्यातील सर्व जिल्हे सुद्धा कोरोनमुक्त होतील असा विश्वासही टोपे यांनी दर्शवला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी (12 जुलै)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 91,745 5244
2 ठाणे 8037 153
3 ठाणे मनपा 14,292 537
4 नवी मुंबई मनपा 10,516 278
5 कल्याण डोंबिवली मनपा 13,832 194
6 उल्हासनगर मनपा 4089 72
7 भिवंडी निजामपूर मनपा 2895 168
8 मीरा भाईंदर 5826 196
9 पालघर 1802 21
10 वसई विरार मनपा 7541 159
11 रायगड 3962 62
12 पनवेल मनपा 4048 95
ठाणे मंडळ एकूण 1,68,585 7179
1 नाशिक 1592 70
2 नाशिक मनपा 4113 127
3 मालेगाव मनपा 1179 85
4 अहमदनगर 487 18
5 अहमदनगर मनपा 297 2
6 धुळे 761 42
7 धुळे मनपा 712 32
8 जळगाव 4303 282
9 जळगाव मनपा 1298 61
10 नंदुरबार 248 11
नाशिक मंडळ एकूण 14,990 730
1 पुणे 3411 97
2 पुणे मनपा 28,058 855
3 पिंपरी-चिंचवड मनपा 5887 108
4 सोलापूर 616 35
5 सोलापूर मनपा 3085 306
6 सातारा 1633 68
पुणे मंडळ एकुण 42,690 1469
1 कोल्हापूर 1015 19
2 कोल्हापूर मनपा 81 0
3 सांगली 489 12
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 89 3
5 सिंधुदुर्ग 257 5
6 रत्नागिरी 857 29
कोल्हापूर मंडळ एकुण 2788 68
1 औरंगाबाद 1806 35
2 औरंगाबाद मनप 6189 297
3 जालना 906 44
4 हिंगोली 337 2
5 परभणी 98 5
6 परभणी मनपा 88 0
औरंगाबाद मंडळ एकूण 9424 383
1 लातूर 387 23
2 लातूर मनपा 243 9
3 उस्मानाबाद 345 14
4 बीड 191 4
5 नांदेड 169 5
6 नांदेड मनपा 384 16
लातूर मंडळ एकूण 1719 71
1 अकोला 329 21
2 अकोला मनपा 1495 70
3 अमरावती 102 7
4 अमवरावती मनपा 704 29
5 यवतमाळ 414 14
6 बुलढाणा 385 16
7 वाशीम 172 4
अकोला मंडळ एकूण 3601 161
1 नागपूर 275 3
2 नागपूर मनपा 1682 18
3 वर्धा 28 1
4 भंडारा 154 0
5 गोंदिया 209 2
6 चंद्रपूर 118 0
7 चंद्रपूर मनपा 39 0
8 गडचिरोली 115 1
नागपूर मंडळ एकूण 2620 25 
1 इतर राज्य 183 30
एकूण 2,46,600 10,116

दरम्यान, कोरोनाचा प्रसार हा जवळपास सर्वच क्षेत्रात होत आहे. काल महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची कोरोना चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आली होती तर दुसरीकडे बीएमसीचे सह आयुक्त अशोक खैरनार (Ashok Khairnar) यांचा काल कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now