Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,132 रुग्णांची नोंद; शहरामध्ये बरे झालेल्या रुग्णांनी ओलांडला 1 लाखाचा टप्पा
यासह शहरातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,26,371 वर पोहोचली आहे. आज शहरामध्ये 923 रुग्ण बरे झाले आहेत व महत्वाचे म्हणजे आतापर्यंत एकूण 1,00070 रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,132 रुग्णांची व 50 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह शहरातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,26,371 वर पोहोचली आहे. आज शहरामध्ये 923 रुग्ण बरे झाले आहेत व महत्वाचे म्हणजे आतापर्यंत एकूण 1,00070 रुग्ण बरे झाले आहेत. आजच्या 50 रुग्णांसह मुंबईमध्ये एकूण 6,940 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईमध्ये 19,064 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बीएमसीने याबाबत माहिती दिली. आज मृत्यू झालेल्या पैकी 39 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते.
यातील 30 रुग्ण पुरुष व 20 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 जणांचे वय 40 वर्षाखाली होते. 30 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 17 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के आहे. 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.81 टक्के आहे. 11 ऑगस्ट 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 6,22,963 इतक्या आहेत, तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 86 दिवस झाला आहे.
(हेही वाचा: मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 9 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2643 वर पोहचला,महापालिकेचे माहिती)
एएनआय ट्वीट -
सध्या मुंबईमध्ये सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 590 इतकी आहे व सक्रिय सीलबंद इमारती 5,515 आहेत. दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरस चाचण्यांचे दर पुन्हा कमी झाले आहेत. तिसऱ्यांदा दरांमध्ये सुधारणा होत आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार, चाचण्यांसाठी 1900, 2200 आणि 2500 रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.