113-Year-Old Kanchanben Badshah Casting Votes: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 113 वर्षीय मतदार कांचनबेन बादशाह यांचे मतदान, नागरिकांना प्रेरणा
113 वर्षीय कांचनबेन बादशाह यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावताना लोकशाहीप्रती असलेली त्यांची अतूट बांधिलकी दाखवून नागरिकांना प्रेरणा दिली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) राज्यातील बहुदा सर्वाधिक वयस्कर (Elderly Voter) म्हणजेच 113 वर्षीय कांचनबेन बादशाह (Kanchanben Badshah) यांनी बुधवारी मतदानाचा हक्क बजावला. आपले वय आणि शारीरिक मर्यादा यांना बाजूला सारत कांचनबेन उत्साह आणि निवडणूक प्रक्रियेप्रती बांधिलकी दर्शवत व्हीलचेअरवरून मतदान केंद्रावर पोहोचल्या आणि त्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. मुंबईतील रहिवासी असलेल्या कांचनबेन यांनी प्रत्येक राज्य विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सातत्याने मतदान केले आहे. नागरी कर्तव्य पार पाडण्याच्या त्यांच्या उल्लेखनीय समर्पणामुळे त्या राज्यभरातील मतदारांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनल्या आहेत.
लोकशाही सहभागाचा वारसा
कांचनबेन यांचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मधील सहभाग हा प्रत्येक मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणार आहे. लोकशाही देशातील एक शक्तिशाली घटना म्हणून याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या कुटंबातील एका सदस्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "या आधीही त्यांनी अनेक निवडणूकांमध्ये मतदान केले आहे. शक्यतो त्यांनी कधीही मतदान चुकवले नाही. प्रत्येक निवडणुकीत त्या नेहमीच्याच उत्साहाने मतदान करतात". आपणासारख्या इतरांनीही मतदान करण्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. कांचनबेन यांचे वय वाढले असले तरी, कांचनबेनची मतदानाची बांधिलकी लोकशाहीतील सक्रिय सहभागाच्या मूल्यावर भर देत तरुण पिढ्यांना प्रेरणा देत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. (हेही वाचा, Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यभरात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान)
एकूण 288 मतदारसंघांसाठी मतदान
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुति आघाडी आणि विरोधी पक्षातील महा विकास आघाडी (एमव्हीए) युती यांच्यात लढाई होत आहे. राज्यातील 5.22 कोटी पुरुष आणि 4.69 कोटी महिलांसह 9.70 कोटी मतदार 4,136 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय घेणार आहेत. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. (हेही वाचा, Suhas Kande Vs Sameer Bhujbal Rada: 'तुझा मर्डर फिक्स', सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यास थेट धमकी)
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदान प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षित व्हावी यासाठी मुंबईत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पोलीस वाहनांची तपासणी करत असून शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यातील एक महत्त्वाचा क्षण आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. सत्ताधारी महायुती आघाडी आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारल्याने ही स्पर्धा तीव्र झाली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)