IPL Auction 2025 Live

Thane Shocker: ठाण्यात 11 वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मात्र, मुलीने घटनास्थळावरून पळ काढला आणि घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांना या गुन्ह्याची माहिती दिली.

Rape | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Thane Shocker: ठाणे (Thane) जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना 12 जुलैच्या रात्री घडली. यावेळी अल्पवयीन मुलगी अंबरनाथ रेल्वे स्थानकाकडे चालली होती. तिच्या वडिलांचे आणि आजीचे ओळखीचे असणारे दोन पुरुष पीडितेकडे आले आणि त्यांनी तिला त्यांच्यासोबत ऑटोरिक्षात बसण्यास सांगितले. जेव्हा पीडितेने त्यांना होकार दिला तेव्हा दोघांनी तिला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, या दोघांनी मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली. मात्र, मुलीने घटनास्थळावरून पळ काढला आणि घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांना या गुन्ह्याची माहिती दिली. (हेही वाचा -Mira Road Rape case: 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल; संतप्त जमावाने फोडला चिकन शॉप)

विशेष म्हणजे, तिच्या पालकांच्या तक्रारीवरून, अंबरनाथ पोलिसांनी शनिवारी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि भारतीय न्याय संहिता (BNS) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. (हेही वाचा - Jalgaon Rape Case: सहा वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या; संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला; जळगाव जिल्ह्यातील घटना)

दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वी शीळ डायघर पोलिसांनी 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याप्रकरणी मंदिरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या तिघांना अटक केली होती. शिळगाव येथील घोळ गणपती मंदिराजवळ पीडितेचा अर्धनग्न, ठेचलेला मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महिलेच्या शरीरावर अनेक जखमा सापडल्या. 9 जुलै 2024 रोजी मंदिराजवळ एका महिलेचा मृतदेह आढळल्याने यासंदर्भात पोलिसांना सतर्क करण्यात आले. नवी मुंबई येथील रहिवासी असलेली पीडित तरुणी बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. तिच्या वडिलांनी नवी मुंबईतील एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या माहितीवरून, शिळ-डायघर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 70(1), आणि 238 अन्वये गुन्हा दाखल केला.