धक्कादायक: 10 वर्षांच्या मुलीवर, 12 वर्षांच्या मुलाचा 4 महिने बलात्कार; मुलगी गर्भवती

यामध्ये ही मुलगी गर्भवती राहिल्याने, मुलीच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर 12 वर्षीय मुलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

मोबाईल आणि इंटरनेटने सध्याच्या पिढीला बिघडवले आहे अशी तक्रार नेहमीच केली जाते. त्यात पालकांचेही आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. याचे परिणाम मोठ्यांवर नाही तर लहानग्यांवरही होताना दिसून येत आहेत. कोवळ्या वयात जिथे एकत्र खेळायच्याऐवजी एखादा समोरच्यावर लैंगिक अत्याचार करीत असेल तर यासाठी कोणाला दोषी ठरवायचे? असा प्रश्न उभा राहतो. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका गावात 10 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये ही मुलगी गर्भवती राहिल्याने, मुलीच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर 12 वर्षीय मुलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गेले चार महिने हा मुलगा या मुलीवर बलात्कार करीत होता. मोखाडा पोलीस (Mokhada Police) याबाबत अधिक तपास करीत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही दोन्ही मुले एकमेकांच्या शेजारी राहतात, गेले चार महिने हा मुलगा या मुलीवर वारंवार बलात्कार करत होता मात्र याची कोणालाही कल्पना आली नाही. काही दिवसांपूर्वी मुलीला ओटीपोटात वेदना झाल्या होत्या. जेव्हा तिच्या पालकांनी तिला उपचारांसाठी डॉक्टरकडे नेले, त्यानंतर तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आले. (हेही वाचा: वडिलांना झाडाला बांधून मुलीवर सामूहिक बलात्कार, 6 नराधमांचे कृत्य)

मुलीला तिच्या पालकांनी याबाबत खोदून विचारले तेव्हा हे सत्य बाहेर आले. त्यानंतर या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आईपीसी आणि पोक्सो (POCSO) एक्टच्या कलम 376 अंतर्गत या मुलावर खटला दाखल करण्यात आला आहे.