Coronavirus Update: तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा आजची महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात कोरोना बाधितांच्या संख्येत 6,875 नवीन रुग्णांची वाढ झाली, यानुसार राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता 2,30,599 वर पोहचला आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणून घेण्यासाठी आत दिलेला तक्ता तपासून पहा.

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात कोरोना बाधितांच्या संख्येत 6,875 नवीन रुग्णांची वाढ झाली, यानुसार राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता 2,30,599 वर पोहचला आहे. याशिवाय कालच्या दिवसात मृत्यू झालेल्या 219 रुग्णांसहित कोरोना मृतांची संख्या सुद्धा 9,667 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 1,27,259 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 93,652 सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात मुंबई मध्ये कोरोनाचा प्रसार अजूनही वेगाने होत आहे, पण चिंतेची बाब अशी की आता मुंबई सहितच अन्यही भाग हे कोरोनाचे हॉटस्पॉट सिद्ध होत आहेत. जसे की कल्याण-डोंबिवली (Kalyan- Dombivli) . कोरोनाच्या रुग्णसंख्येत मुंबई, ठाणे (Thane), पुणे (Pune) पाठोपाठ आता केडीएमसी भागात कोरोनाचे 10 हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला तक्ता तपासून पहा.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा समाधानकारक असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले आहे. आकडेवारी पाहिल्यास मृत्यू दर हा अवघा 4.19 टक्के आहे.तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा 55.19 टक्के इतका आहे. Coronavirus Cases In Mumbai: मुंबईमध्ये आज 1,282 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, तर 68 रुग्णांचा मृत्यू; शहरातील एकूण रुग्णांची संख्या 88,795 वर पोहचली

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी (10 जुलै)

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 89124 5132 60195
ठाणे 54811 1483 22821
पुणे 33394 989 15179
पालघर 8575 161 4152
औरंंगाबाद 7413 314 3408
रायगड 7152 142 3362
नाशिक 6233 264 3435
जळगाव 4996 319 2850
सोलापुर 3539 329 1907
नागपुर 1855 19 1345
अकोला 1784 91 1416
सातारा 1533 64 884
धुळे 1388 69 824
कोल्हापुर 1043 16 759
जालना 852 35 474
रत्नागिरी 823 28 531
अमरावती 754 32 530
अहमदनगर 661 20 453
लातुर 552 28 277
सांगली 523 13 283
नांदेड 502 19 246
यवतमाळ 377 14 260
बुलढाणा 368 13 190
उस्मानाबाद 329 14 203
हिंंगोली 323 1 268
सिंधुदुर्ग 254 5 201
नंदुरबार 236 11 149
गोंदिया 193 2 127
बीड 185 4 101
परभणी 167 4 96
वाशिम 146 3 95
चंंद्रपुर 129 0 80
भंडारा 99 0 80
गडचिरोली 94 1 64
वर्धा 26 1 14
अन्य जिल्हे 166 27 0
एकुण 230599 9667 127259

दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीएमसीच्या तसेच खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेखीसाठी नेमलेल्या सनदी अधिकाऱ्यांकडून, कोरोना विषाणू उपाययोजनांचा आढावा घेतला होता. मुंबईतील झोपडपट्टी भागात कोरोना विषाणू संसर्ग थांबविणे, सोबत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारावर उपचार करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now