SRA च्या प्रत्येक प्रकल्पामध्ये झोपडपट्टी धारकांसाठी 1 ते 5 हजार स्क्वेअर फूटांचं प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणार - जितेंद्र आव्हाड

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

Jitendra Awhad (PC- Twitter)

एसआरए (SRA) च्या प्रत्येक प्रकल्पामध्ये झोपडपट्टी धारकांच्या प्रकृतीची काळजी म्हणून यापुढे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे याचं पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी झोपडपट्टी धारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'यापुढे एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये झोपडपट्टी धारकांच्या प्रकृतीची काळजी म्हणून 1000 ते 5000 स्क्वेअर फूटांचं प्रथामिक आरोग्य केंद्र (मोफत एफएसआयच्या धर्तीवर) बांधण्याचा निर्णय एसआरएने घेतला आहे. तसे आदेश मी पारित केले आहेत.' (हेही वाचा - Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना विषाणू रुग्णांची संख्या 1 लाखाच्या वर; राज्यात एकूण 1,01,141 संक्रमित लोक)

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई शहरात आढळून येत आहेत. मुंबईतील दादर, धारावी, भागात कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. त्यामुळे या भागात दररोज हजारो रुग्णांना कोरोनाचं संक्रमण होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज 3493 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,01,141 वर पोहोचला आहे. आज दिवसभरात 127 नवीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात आतापर्यंत एकूण 3717 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.