Coronavirus Cases In Pune: पुणे शहरात आज दिवसभरात 1 हजार 699 नवे कोरोनाबाधित रुग्ण; तर 30 जणांचा मृत्यू

तर 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 53 हजार 437 इतकी झाली आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

Coronavirus Cases In Pune: पुणे (Pune) शहरात आज दिवसभरात 1 हजार 699 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus Patients) भर पडली आहे. तर 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 53 हजार 437 इतकी झाली आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

आज पुणे शहरातील 1315 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. पुणे शहरातील आतापर्यंत एकूण डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या 33 हजार 938 झाली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले आहेत. (हेही वाचा - COVID19 Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 11 हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 266 जणांचा मृत्यू)

दरम्यान, आज पुण्यात आणखी 30 कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले असून यात DMH 7, ससून 6, नवले 5, नोबेल 2, भारती 2, बुधराणी, नायडू, जहांगीर, ग्लोबल, रुबी, सह्याद्री (कोथरूड), सह्याद्री (हडपसर) आणि सह्याद्री (कर्वे रोड) प्रत्येकी 1 अशा तपशील आहे. सध्या शहरात उपचार घेणाऱ्या 18 हजार 215 रुग्णांपैकी 927 रुग्ण गंभीर असून यातील 471 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 456 रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

पुणे शहरात आज एकाच दिवसात 6 हजार 241 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 2 लाख 67 हजार 241 इतकी झाली आहे. यासंदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, आज राज्यात सर्वाधिक 11 हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.