Maharashtra Monsoon 2019 Live Updates: 5 जुलैपर्यंत ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई सह महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनने काल रात्रीपासून दमदार हजेरी लावली. दरवर्षीपेक्षा यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने बळीराजासह सामान्य नागरिकही चिंतेत होते.

02 Jul, 02:17 (IST)

मुसळधार पावसाचा रायगड जिल्हा रुग्णालयालाही जोरदार फटका बसला. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्हा रुग्णालयात पाणी घुसले. रुग्णालयात पाणी अचानक घुसल्याने रुग्णांची तसेच कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचीही मोठी अडचण झाली.

02 Jul, 01:34 (IST)

मुंबई शहर आणि उपनगरांत कोसळलेल्या संततधार पावसाचा शहरातील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला. शहरात आणि रेल्वे मार्गांवर साचलेले पाणी त्यामुळे झालेली वाहतुक कोंडी आदी कारणांमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या लोकल्सच्या सुमारे 100 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

02 Jul, 24:51 (IST)

मुंबई मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि इतर स्थानकावरुन सुटणाऱ्या दीर्घ पल्याच्याच्या एक्सप्रेस गाड्या एक तास 50 मिनिटांनी उशिरा सुटणार आहेत. मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे ही माहिती प्रवाशांना दिली.

11093 #CSMT-#Varanasi #Mahanagari #Express sch dep 0010 hrs on 2.7.2019 is #RESCHEDULED at 0200 hrs on 2.7.2019 (Delay by one hour 50 minutes). Inconvenience caused is regretted.

02 Jul, 24:51 (IST)

मुंबई मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि इतर स्थानकावरुन सुटणाऱ्या दीर्घ पल्याच्याच्या एक्सप्रेस गाड्या एक तास 50 मिनिटांनी उशिरा सुटणार आहेत. मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे ही माहिती प्रवाशांना दिली.

11093 #CSMT-#Varanasi #Mahanagari #Express sch dep 0010 hrs on 2.7.2019 is #RESCHEDULED at 0200 hrs on 2.7.2019 (Delay by one hour 50 minutes). Inconvenience caused is regretted.

02 Jul, 24:35 (IST)

मुंबई (Mumbai) शहरात सोमवारी (1 जुलै 2019) मुसळधार पाऊस पडला. गेल्या 48 तासात सरासरी तब्बल 550 मिलिमीटर पेक्षाही अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकाधिक कमी त्रास होईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तरीही नागरिकांना आम्ही सावधानतेचा आणि काळजी घेण्याची विनंती करतो, असे अवाहन मुंबई महापालिका ( BMC)  प्रशासनाने ट्विटरद्वारे केले आहे.

02 Jul, 24:16 (IST)

मालाड परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मालाड सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर, या मार्गावरील वाहतूक दस्त मंदिर रस्ता, एसवी रोड मार्गे वळविण्यात आली आहे. 

Malad subway has been closed due to water logging. Traffic has been diverted via Datta Mandir Road- WEH towards S.V Road #TrafficUpdateMumbai #MumbaiRains #MumbaiRainsLive #MumbaiRainsLiveUpdates

— Mumbai Police (@MumbaiPolice) July 1, 2019

02 Jul, 24:04 (IST)

मुंबई शहरात पाणी साचल्याबद्दल प्रसारमाध्यमांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना विचारले असता, तुम्ही उगाच प्रश्न निर्माण करत आहात. मुंबई कुठेच तुंबली नाही. इतकंच नव्हे तर, कुठेही पाणी तुंबलेलं नाही किवा वाहतूक कोंडी झालेली नाही. मुंबईचे जनजीवन अजिबात विस्कळीत झालेलं नाही’, असा निराधार दावा केला.

 

01 Jul, 23:43 (IST)

मुंबई शहरात पावसाने आज दमदार हजेरी लावली. पावसाची संततधार कायम राहिल्याने. मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऑफिस संपल्यावर सायंकाळी घरी परतणाऱ्या मुंबईकरांची मोठी अडचण झाली.

01 Jul, 22:31 (IST)

5 जुलैपर्यंत ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

01 Jul, 22:09 (IST)

मुसळधार पावसाने नवी मुंबईची देखील दैना झालेली पाहायला मिळाली. नवी मुंबईतही अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले.

01 Jul, 21:48 (IST)

काल रात्रीपासून मुंबईत सुरु झालेला मुसळधार पाऊस पुढील 24 तास कायम राहणार असल्याचा अंंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

01 Jul, 21:36 (IST)

विश्रांतीनंतर मुंबई सह उपनगरांमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने सकाळी ऑफिस गाठण्यासाठी चाकरमान्यांना जे हाल सहन करावे लागले. तोच त्रास त्यांना पुन्हा एकदा अनुभवावा लागणार आहे. 

01 Jul, 20:41 (IST)

मुंबई सह उपनगरांत पावसाचा जोर कमी झाल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली आहे. तिन्ही मार्गांवरील रेल्वेसेवा पूर्ववत करण्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप मुंबईच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी आहे. 

01 Jul, 20:34 (IST)

कर्जत लोणावळा दरम्यान मालगाडीचे डब्बे घसरल्यानंतर वाहतुकीच्या मार्गात करण्यात आलेल्या बदलांची माहिती मध्य रेल्वेने ट्विट करुन दिली आहे.

01 Jul, 18:34 (IST)

मुसळधार पावसामुळे आज प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. वाहतूकीच्या खोळंब्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात तुफान गर्दी उसळली. याचाचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.

01 Jul, 18:05 (IST)

मुसळधार पावसासह समुद्राला उधाण. समुद्रात उंचच उंच लाटा

01 Jul, 17:49 (IST)

मुसळधार पावसानंतर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत.

01 Jul, 17:47 (IST)

मुंबईतील किंग सर्कल परिसरात पाणी साचले.

01 Jul, 17:23 (IST)

मुंबईतील इस्टर्न फ्री वे वरील भक्ती नगर भागात ट्रॅफीक जॅम

Read more


मुंबई सह महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनने काल रात्रीपासून दमदार हजेरी लावली. दरवर्षीपेक्षा यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने बळीराजासह सामान्य नागरिकही चिंतेत होते. मात्र उन्हाने तापलेल्या महाराष्ट्राला मान्सूनने थंडगार केले आहे.

मुंबईत सध्या पावसाने जोर धरला असून त्याचा परिणाम वाहतूकीवर झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे नोकरदारवर्गाची गैरसोय होण्याची शक्यता आहे. मुंबई शिवाय इतर भागातही होणाऱ्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे अनेक रेल्वे लोकल्स खोळंबल्या आहेत. तर काही रद्द करण्यात आल्या आहेत.

तर येथे पहा आज कोणत्या ठिकाणी किती पाऊस झाला आणि आजचा पावसाच्या अंदाजाचे लाईव्ह अपडेट्स...

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now