IPL Auction 2025 Live

World Book Day 2020: शेक्सपियर च्या पुण्यतिथी दिवशी का साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन; जाणून घ्या काही इंटरेस्टिंग गोष्टी

साहित्य जगतामध्ये शेक्सपियर यांना असलेल्या आदराच्या स्थानामुळे युनेस्कोने 1995 साली तर भारत सरकारने 2001 साली 23 एप्रिल दिवशी जागतिक पुस्तक दिन सेलिब्रेशनची घोषणा केली.

जागतिक पुस्तक दिन 2020 । File Photo

जागतिक पुस्तक दिन हा 23 एप्रिल दिवशी साजरा केला जातो. UNESCO सह जगभरातील साहित्य संबंधित संस्थांकडून दरवर्षी जागतिक पुस्तक दिनाचं सेलिब्रेशन केलं जातं. हा दिवस जगभरातील 10 देशांमध्ये साजरा केला जातो. आजच्या दिवशी जागतिक पुस्तक दिनासोबत World Book and Copyright Day देखील आजचं साजरा केला जातो. 'युनेस्को'कडून या दिवसाचं सेलिब्रेशन करताना William Shakespeare, Miguel Cervantes आणि Inca Garcilaso de la यांना आदरांजली म्हणून आजची तारीख निवडली गेली आहे. युनेस्कोच्या पॅरिसमधील सर्वसामान्य सभेमध्ये 1995 साली जगभरातील लेखल आणि पुस्तकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा करण्यास सुरूवात झाली.

23 एप्रिल 1564 दिवशी महान कवी, लेखक,नाटककार शेक्सपियर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अनेक नाटकांचा, साहित्यकृतींचा भारतासह जगभरातील विविध भाषांमध्ये भाषांतरही झाले. त्यांनी 35 नाटकं आणि 200 पेक्षा अधिक कविता लिहल्या आहे. साहित्य जगतामध्ये शेक्सपियर यांना असलेल्या आदराच्या स्थानामुळे युनेस्कोने 1995 साली तर भारत सरकारने 2001 साली 23 एप्रिल दिवशी जागतिक पुस्तक दिन सेलिब्रेशनची घोषणा केली. World Book Day 2020: Lockdown असो की 'एकांत', प्रत्येक वेळी नवा अनुभव देणारा मित्र 'पुस्तक'.

पुस्तक दिन आणि पुस्तकांबद्दल काही इंटरेस्टींग गोष्टी

जागतिक पुस्तक दिन हा जगभरातील अनेक लोकांसाठी महत्त्वाचं व्यासपीठ बनलं आहे. यामुळे प्रामुख्याने साहित्य क्षेत्रातील निगडीत व्यक्ती, उद्योजक, लेखक, प्रकाशक, शिक्षक, वाचनालयं, संस्था, एनजीओ आणि मास मीडीयाला शिक्षणाला चालना देऊन सार्‍यांनाच आनंदासोबतच ज्ञानाचीदेखील देवाणघेवाण करता येते.