Wedding Special Ukhane For Boys: बायकोला खुश करण्यासाठी नवरदेवाने लग्नात घ्यायलाच हवे 'हे' हटके उखाणे, पहा यादी

अशावेळी अनेकांची गाडी केवळ भाजीत भाजी मेथीची इथवरच येऊन अडकून पडते. असं होऊ द्यायचं नसेल तर ही खास उखाण्यांची यादी एकदा नक्की तपासून पहा..

Maharashtrian Groom Ukhane (Photo Credits: Instagram)

उखाणा (Ukhana) हा मराठी लग्नातील (Maharashtrian Wedding) एक अविभाज्य घटक आहे. लग्नात, नवरा नवरीला प्रत्येक विधीत घरातील हौशी मंडळी उखाणे घेण्याचा आग्रह करत असतात. सुरुवातीला उखाणे घेण्याची पद्धत केवळ नव्या नवरीसाठी होती, मात्र सगळ्याच गोष्टीत खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या पार्टनर्सने इथेही आपली साथ दाखवून दिली तर हरकत काय? याच न्यायाने अलीकडे नवरदेवांना सुद्धा उखाणे घेण्याचा आग्रह केला जातो. अशावेळी अनेकांची गाडी केवळ भाजीत भाजी मेथीची इथवरच येऊन अडकून पडते. आणि मग वैतागून सर्वांचे सुस्कारे ऐकणे हा एकच पर्याय उरतो. असं होऊ द्यायचं नसेल तर ही खास उखाण्यांची यादी एकदा नक्की तपासून पहा..

अर्थात तुम्हाला यंदा कर्तव्य असेल तर तुम्हीही ही तयारी आधीपासूनच करायला हवी नेमके ऐन वेळी काही न आठवल्याने तुमची पंचाईत होऊ नये म्हणून आम्ही तुमच्यासाठी हे लास्ट मिनिट उखाणे गाईड घेऊन आलो आहोत. तुमच्या बायकोला आपल्या प्रेमाची जाणीव लग्नादिवसापासूनच करून द्यायची ही संधी सोडू नका चला तर पाहुयात हे खास हटके उखाणे.. Wedding Special Ukhane For Bride: नव्या नवरीने घ्यायचे 'हे' हटके उखाणे लग्न सोहळ्यातील विधींसाठी आहेत बेस्ट पर्याय

1)नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,

……..झाली आज माझी गृहमंत्री.

2) गाडीत गाडी डेक्कन क्वीन,

……. आहे माझी ब्युटी क्वीन.

3) मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,

……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

4) एक होती चिऊ, एक होता काऊ,

……..चे नाव घेतो डोक नका खाऊ

5) काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात

प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात

6) जाईच्या वेणीला चांदीची तार,

माझी … म्हणजे लाखात सुंदर नार,

7) मातीच्या चुली घालतात घरोघर,

… झालीस माझी आता चल बरोबर

8) उमाचा महादेव आणि सितेचा राम,

..... आली जीवनी आता आयुष्यभर आराम.

9) नंदनवनात अमृताचे कलश

.... आहे माझी खूप सालस

Special one

10) खायला तिला आवडते पाणीपुरी

... माझी आहे एकदम मिठी छुरी

आपल्या पत्नीचे कौतुक करण्याची ही संधी अजिबात सोडू नका यामुळे भविष्यात तुम्हाला ब्राउनी पॉईंट मिळू शकतात. या सर्व रीती परंपरा या तुमच्या आनंदासाठी आहेत त्यामुळे सर्वात महत्वाचे म्हणजे आनंद उपभोगत आपला लग्नसोहळा फुल्ल ऑन एन्जॉय करा.. आणि हो तुम्ही काही वेगळा उखाणा घेणार असाल तर आम्हालाही कळवा..



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif