ऑफिसमध्ये उत्साही राहण्यासाठी वापरा 'या' टिप्स, करियरसाठी ठरतील फायदेशीर

देशभरात सर्वत्र ऑफिसच्या ठिकाणी कामाच्या बाबत सर्वेक्षण केले जाते. त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टी समजण्यास सहज सोपे होत असल्याचे दिसून आले आहे. या गोष्टी अमलात आणल्यानंतर कंपनीसह कर्मचाऱ्यांना त्याचा फार मोठा फायदा होतो. याच प्रकारच्या एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, 30 टक्के कर्मचारी स्वत:ला कामापासून थोडे लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

देशभरात सर्वत्र ऑफिसच्या ठिकाणी कामाच्या बाबत सर्वेक्षण केले जाते. त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टी समजण्यास सहज सोपे होत असल्याचे दिसून आले आहे. या गोष्टी अमलात आणल्यानंतर कंपनीसह कर्मचाऱ्यांना त्याचा फार मोठा फायदा होतो. याच प्रकारच्या एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, 30 टक्के कर्मचारी स्वत:ला कामापासून थोडे लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे कर्मचाऱ्यामध्ये कामाबाबत कुठेतरी खटके उडालेले असतात किंवा त्यांचे काम दुसऱ्यांना आवडत नाही. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा या परिस्थितीतून जात असल्यास काही गोष्टी जरुर लक्षात घ्या. तसेच तुम्हाला सेल्फ मोटिवेशनची फार गरज आहे. त्यामुळे एक्सपर्टच्या मते तुम्ही जर कामात खुश नसाल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या वागण्यासह ऑफिसमधील अन्य कामावर होण्याची फार शक्यता असते. परंतु ऑफिसमध्ये नेहमीच उत्साही राहणे हे यशस्वी बनवण्याचा एक मार्ग असून त्याचा वापर केला पाहिजे. तर ऑफिसमध्ये उत्साही राहण्यासाठी वापरा या टिप्स.

-तुमची ऑफिसमधील भुमिका उत्तमरित्या समजून घ्या. त्याचसोबत ऑफिसच्या कामाच्या व्यतिरिक्त तुम्ही काय वेगळे करु शकता याकडे सुद्धा लक्ष देण्यासोबत तो काम योग्य रितीने पूर्ण करा.

-सध्या स्पर्धेच्या जगात तुमचे आयुष्यातील लक्ष काय आहे हे स्पष्ट असू द्या. त्यामुळे जर तुमचे टारगेट स्पष्ट असल्यास काम तुम्ही सहज सोप्या पद्धतीने पार पाडू शकता.

-ऑफिसच्या ठिकाणी स्वत:ला उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच दररोज नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केल्यास त्यामधून मिळणारा आनंद तुमच्या पुढील कामांमध्ये दिसून येईल.

-कामाच्या व्यतिरिक्त अन्य काही गोष्टींचे वाचन करा त्यामुळे तुम्हाला दुसरे ज्ञान मिळण्यासोबत तुमच्या बुद्धीला चालना मिळण्यास मदत होईल. यामुळे एखाद्या गोष्टीबाबत दुसऱ्या व्यक्तीला अडचण आल्यास तुम्ही त्याची मदत करु शकता.

-एक्सपर्टच्या मते प्रगती करणाऱ्या कंपनीत तुम्ही जर काम करत असल्यास तुमच्या वरिष्ठांकडून तुमचा फिडबॅक जाणून घ्या. त्यामुळे तुम्हाला कामात तुम्ही किती उत्तम आहात किंवा कुठे मागे पडत आहात याची जाणीव होईल.(तुमच्या 'या' सवयींमुळे करियर धोक्यात येऊ शकते, आजच करा बदलाव)

 तर ऑफिसच्या ठिकाणी नेहमीच सकारात्मक भुमिकेने काम करावे असे सांगितले जाते. यामुळे काही गोष्टी योग्य मार्गाने पूर्ण होण्यास मदत होते. त्याचसोबत कामात जर काही गोष्टी योग्य होत नसल्यास तुमची सकारात्मक भुमिका या वेळी कामी येऊ शकते. एवढेच नाही वरिष्ठांकडून किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांकडून काही चांगल्या गोष्टी ऐकायला किंवा शिकायला मिळत असल्यास त्याबाबत नोट लिहून ठेवत जा. त्याचसोबत नोटडाऊन केलेल्या चांगल्या गोष्टी अमलात आणल्यास तुम्ही ऑफिसच्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी आनंदी दिसाल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Adar Poonawalla: 'माझ्या पत्नीला रविवारीही माझ्याकडे पाहत राहणे आवडते'; सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांची 90 तास काम करण्यावरून प्रतिक्रीया

Anand Mahindra On 90-Hour Work Week: 'माझी पत्नी खूप सुंदर आहे, तिला पाहत राहणं छान वाटतं'; कामाच्या वेळेवरील SN Subrahmanyan यांच्या वादग्रस्त विधानानंतर आनंद महिंद्रा यांची प्रतिक्रिया

90-Hour Work Week Debate: ‘वरीष्ठांपासून अंमलबजावणी सुरुवात करू द्या’; SN Subrahmanyam यांच्या विधानावर Rajiv Bajaj यांची प्रतिक्रीया, तासांच्या गुणवत्तेपेक्षा कामाची गुणवत्ता महत्त्वाची (Watch Video)

Mumbai Metro Line 2B: मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रो लाईन 2ब पूर्णत्वाच्या मार्गावर, 78 टक्के काम पूर्ण, जाणून घ्या स्थानके व इतर तपशील

Share Now