World Photography Day 2021: जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त राज्य पर्यटन विभागाने जाहीर केली 'फोटोग्राफी स्पर्धा'; जाणून घ्या नियम व कुठे अपलोड कराल आपला फोटो 

महाराष्ट्र पर्यटन विभागाने 19 ऑगस्ट रोजीचा 'जागतिक छायाचित्र दिन 2021' हा आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्याची घोषणा केली आहे. या दरम्यान, पर्यटन विभाग एक आठवडाभर फोटोग्राफी स्पर्धा, प्रवास, फूड फोटोग्राफी आणि हॅरिटेज वॉक वर लाइव्ह कार्यशाळा आयोजित करेल.

World Photography Day 2021: जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त राज्य पर्यटन विभागाने जाहीर केली 'फोटोग्राफी स्पर्धा'; जाणून घ्या नियम व कुठे अपलोड कराल आपला फोटो 
World Photography Day (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र पर्यटन विभागाने 19 ऑगस्ट रोजीचा 'जागतिक छायाचित्र दिन 2021' हा आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्याची घोषणा केली आहे. या दरम्यान, पर्यटन विभाग एक आठवडाभर फोटोग्राफी स्पर्धा, प्रवास, फूड फोटोग्राफी आणि हॅरिटेज वॉक वर लाइव्ह कार्यशाळा आयोजित करेल. नवोदित आशय निर्मात्यांना एकत्र आणणे आणि महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देणे हा यामागील उद्देश आहे. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने 11 ऑगस्ट 2021 पासून इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर #MaharashtraThroughMyLens ही फोटोग्राफी स्पर्धा जाहीर केली आहे.

यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या पर्यटनाशी निगडीत कुठलाही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर किंवा फेसबूक वॉलवर #MaharashtraThroughMyLens या हॅशटॅगसह तसेच महाराष्ट्र टूरिझमच्या अधिकृत हँडलला(www.facebook.com/maharashtratourismofficial आणि www.instagram.com/maharashtratourismofficial) टॅग करून या स्पर्धेत प्रवेश नोंदवू शकता. फोटो अपलोड करताना तो वन्यजीव, लँडस्केप, साहस, निसर्ग, ग्रामीण आणि शहरी जीवन, वारसा, संस्कृती, खाद्य इत्यादी पुरताच मर्यादित असावा असे नाही. यामध्ये आपण आपली कल्पकता वापरू शकता.

स्पर्धकाच्या फोटोग्राफीची अभिनव शैली, फ्रेमिंग, कॉम्पोझिशन, एडिटिंग स्किल्स आणि सोशल मीडियावरील त्यांच्या फोटोला मिळालेला प्रतिसाद हे निकष विचारात घेऊन विजेत्यांची निवड केली जाईल. 19 ऑगस्ट 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने निकाल घोषित केले जातील. प्रथम पुरस्कार 25 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 10 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 5 हजार रुपये याप्रमाणे बक्षीसे दिली जातील. त्याचबरोबर इतर निवड झालेल्या 20 स्पर्धकांना प्रत्येकी  1 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

याच उपक्रमातील दुसऱ्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील हेरीटेज वॉक असेल. यामध्ये वरिष्ठ छायाचित्रकारासोबत उत्साही 20 छायाचित्रकारांना हेरीटेज वॉकची संधी मिळेल. हा हेरिटेज वॉक 19 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत असेल. हेरीटेज वॉकच्या माध्यमातून विविध वारसा इमारतींना भेट देण्याची आणि वेगवेगळ्या दृष्टीकोनातून छायाचित्रे टिपण्याची संधी मिळेल. ही छायाचित्रे  #MaharashtraThroughMyLens या हॅशटॅगसह महाराष्ट्र पर्यटनच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सला टॅग करुन सोशल मीडियावर अपलोड करण्यात येतील.

जागतिक छायाचित्रण दिनी 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी महाराष्ट्र पर्यटनच्या इन्स्टाग्राम हँडलवर (www.instagram.com/maharashtratourismofficial) ऑनलाईन कार्यशाळा होईल. कार्यशाळेत त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींकडून नव्याने या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना फूड फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी, कथाकथन यावर आधारित मार्गदर्शन केले जाईल. या इंस्टाग्राम ऑनलाइन कार्यशाळा प्रत्येकी 30 मिनिटांच्या असतील.

(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2021 08:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).