Weever Fish: वाळूतला मासा, लपतो कसा? हळूच मारतो डंक, समोरचा बेशुद्ध; नाव त्याचे 'वीवर फिश'
का संशोधनात अभ्यासकांनी माशाच्या अशा एका प्रजातीबद्दल सांगतले आहे. ज्यामुळे आपल्याला नक्कीच सावध व्हावे लागेल. ज्याचे मूळ नाव क्रेशियन्स (Crustacean) असे आहे परंतू तो वीवर फिश (Weever Fish) नावाने ओळखला जातो. क्रेशियन्स (Crustacean) हा मासा म्हणे वाळूत राहतो. वाळूत लपतो आणि आपल्या भक्ष्याचा अतवा शत्रूचा शोध घेतो. सावज टप्प्यात येताच असा डंख मारतो की, पुढचा बेशुद्धच होतो.
समुद्र (Sea) म्हणजे नानाविध जैवविविधतेचे भांडार. दररोज नवनवे मासे, प्राणी आणि जीव यांचा परिचय करुन देणारी एक वेगळीच सृष्टी. त्यामुळे सहाजिकच या सृष्टीबाबत नेहमीच संशोधन सुरु असते. अशाच एका संशोधनात अभ्यासकांनी माशाच्या अशा एका प्रजातीबद्दल सांगतले आहे. ज्यामुळे आपल्याला नक्कीच सावध व्हावे लागेल. ज्याचे मूळ नाव क्रेशियन्स (Crustacean) असे आहे परंतू तो वीवर फिश (Weever Fish) नावाने ओळखला जातो. क्रेशियन्स (Crustacean) हा मासा म्हणे वाळूत राहतो. वाळूत लपतो आणि आपल्या भक्ष्याचा अतवा शत्रूचा शोध घेतो. सावज टप्प्यात येताच असा डंख मारतो की, पुढचा बेशुद्धच होतो. रॉयल नेशनल लाइफबोट इंस्टीट्यूशन संस्था अर्थातच आरएनएलआई (RNLI) ने याबाबत अभ्यासकांचा एक विस्तृत शोधनिबंध छापला आहे.
आरएनएलआईच्या शोधनिबंधात यूनायटेड कंग्डम आणि आयर्लंड येथील समुद्र किनारपट्टीवर आढळणाऱ्या माशांच्या एका छोट्या प्रजातीबद्दल इशारा देण्यात आला आहे. संस्थेने म्हटले आहे की, क्रस्टेशिंसन्समध्ये प्रजात विशारी असते. ही प्रजाती इतकी विशारी असते की, या प्रजातीचा मासा मानवास चावल्यास तो बेशुद्ध होऊ शकतो. साधारण हलक्या रंगाचा हा मासा वाळूमध्ये सहज सामावला जातो. या माशाचा सर्वाधिक वेळ हा वाळूत स्वत:ला लपवून घेण्यातच जातो. त्याचा पृष्ठभाग आणि जमीन (वाळू) सारखेच असल्याने हे पटकन ओळखता येत नाहीत. (हेही वाचा, Blue Bottle Jellyfish in Mumbai: मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर 'ब्लू बॉटल जेलीफिश'; पर्यटन आणि गणोश विसर्जनादरम्यान काळजीची आवश्यकता)
शोधनिबंधात वीवर फीशबद्धल RNLI ने लिहीले आहे की, वाळूत लपल्यावर जमीनीच्या पृष्ठभागावर या माशाचे 3 विषारी मणके वरच्या बाजूला असतात. ज्यामुळे ती शत्रूपासून बचाव करु शकते. समुद्र किनारपट्टीवर आढळून येणाऱ्या विशारी आणि तितक्याच धोकादायक माशांबद्दल सावधानतेचा इशारा या लेखाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
वीवर माशाने डंक दिल्यास वेदना जाणवतात. परंतू घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्हाला काही काळ त्रास जानवेल पण पुढे या वेदना कमी होतील. पण, महत्त्वाचे म्हणजे या माशाचा डंक तुमच्या शरीरात किती भीनतो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामळे व्यक्तीची त्वाचा, त्रास सहण करण्याची क्षमता यावर वेदनेचे स्वरुप अवलंबून असते. ज्यांना वेदना सहन होत नाहीत, असे लोक काही काळ बेशुद्धही होऊ शकतात.
RNLI इशारा देते की, जर तुम्ही वीवर फीश असलेल्या समुद्र किनारपट्टीलगत फिरत असाल तर काळजी घ्या. पायात चप्पल, बूट घाला. अगदी गमबूट असतील तर उत्तम. ज्यामुळे हा मासा आपल्याला चावनार नाही. तसेच आपल्या पायांचे संरक्षण होईल. प्रशासनाने तत्काळ मदत आणि स्वयंसेवक अशा भागात उभे करावेत. जेणेकरुन हा मासा चावल्यास तातडीने वैद्यकीय मदत पोहोचवली जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)