Vande Bharat Train Maharashtra: पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे महाराष्ट्रात 3 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार; जाणून घ्या वेळापत्रक

20669/20670, ट्रेन क्रमांक 20673/20674 आणि ट्रेन क्रमांक 20101 चे बुकिंग आज 16 सप्टेंबर पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होणार आहे.

Photo Credit- X

महाराष्ट्रामध्ये मधून 3 नव्या वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) धावण्यास सुरूवात होणार आहे. पुणे ते हुबळी (Pune- Hubli Vande Bharat Train) ,नागपूर ते सिकंदराबाद (Nagpur-Secunderabad ), कोल्हापूर ते पुणे (Kolhapur-Pune Vande Bharat Train) या तीन मार्गांवर या नव्या वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. पुणे, कोल्हापूर, हुबळी मार्गावर 8 डब्ब्यांची तर नागपूर-सिकंदराबाददरम्यान 20 डब्ब्यांची वंदे भारत धावणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत देशात 'वंदे भारत' ट्रेन धावत आहे. आता या ट्रेनचं जाळं सर्वत्र पसरलं आहे.

पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस चा ट्रेन क्रमांक 20670 असणार आहे. ही पुणे-सांगली हुबळी वंदे भारत एक्सप्रेस गुरुवारी, शनिवार, सोमवार धावणार आहे. पुण्यातून दुपारी 2.15 वाजता निघेल. सांगलीत संध्याकाळी 6.10 ला पोहोचेल. बेळगावी रात्री 8.34 ला पोहोचेल. धारवडला रात्री 10.30 ला येईल. तर हुबळीत रात्री 10.45 ला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासामध्ये 20669 ही गाडी हुबळी-सांगली-पुणे असणार आहे. ती दर बुधवार, शुक्रवार, रविवारी हुबळीहून पहाटे 5 वाजता सुटणार असून धारवाडला पहाटे 5 वाजून 17 मिनिटांनी येईल. बेळगावात सकाळी 6.55 ला पोहोचेल. सांगलीला सकाळी 9.30 वाजता येईल. तर पुण्यात दुपारी 1.30 वाजता येईल.

कोल्हापूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेस 20673 ट्रेन क्रमांकची असणार आहे. गुरुवारी शनिवारी सोमवारी ही गाडी धावणार आहे. कोल्हापूरहून सकाळी 8.15 ला निघेल. सांगलीत सकाळी 9.05 ला येईल. किर्लोस्करवाडीत 9.42 ला येईल. तर पुण्यात दुपारी 1.30 वाजता पोहोचणार आहे. परतीचा प्रवास करताना ही गाडी 20674 असणार आहे. दर बुधवार शुक्रवार आणि रविवारी धावणार आहे. ही गाडी पुण्याहून दुपारी 2.15 वाजता निघणार आहे. किर्लोस्करवाडीत 5.50 ला येईल. सांगलीत संध्याकाळी 6.10 ला येईल. तर कोल्हापुरात रात्री 7.40 ला पोहोचणार आहे. Vande Bharat Trains: लवकरच सुरु होणार Pune-Hubli आणि Kolhapur-Pune मार्गावर आठ डब्यांच्या वंदे भारत गाड्या; जाणून घ्या वेळा, थांबे आणि इतर तपशील .

नागपूर सिंकदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस चा ट्रेन क्रमांक 20101 असणार आहे. ही ट्रेन 19 सप्टेंबर पासून आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. नागपूर मधून सकाळी 5 ला निघणारी ही ट्रेन त्याच दिवशी 12.15 ला सिकंदराबादला पोहचणार आहे. 20102 सिकंदराबाद-नागपुर वंदे भारत एक्सप्रेस ही दुपारी 13.00 वाजता सिकंदराबाद मधून सुटणार असून त्याच दिवशी 20.20 ला नागपूरला पोहचणार आहे.

दरम्यान ट्रेन क्रमांक 20669/20670, ट्रेन क्रमांक 20673/20674 आणि ट्रेन क्रमांक 20101 चे बुकिंग आज 16 सप्टेंबर पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होणार आहे.