USA ते UAE पहा कोविड 19 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना परदेशात कुठे कुठे मिळणार प्रवेश

मागील दीड वर्षांपासून घरातच कोंडून बसलेल्या अनेकांना आता ब्रेकची गरज आहे. हळूहळू कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा सुरू झाली आहे.

airports | (Photo Credit: Twitter)

आता सुट्ट्यांच्या काळ सुरू होत आहे. मागील दीड वर्षांपासून कोरोनाची दहशत (Coronavirus) आणि लॉकडाऊन  (Lockdown) मुळे घरातच कोंडून बसलेल्या अनेकांना आता ब्रेकची गरज आहे. हळूहळू कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा सुरू झाली आहे. यामध्ये अनेक देशांनी कोविड 19 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना त्यांच्या बॉर्डर्स खुल्या केल्या आहेत. सध्या परदेशी प्रवास म्हणजे व्हॅक्सिनेशन आलंच. मग तुम्ही देखील आता परदेशी प्रवासाची स्वप्न पाहत असाल तर जाणून घ्या कोणकोणत्या देशांनी भारतीय प्रवाशांसाठी खुली केली आहेत त्यांची दारं? भारतात लहान मुलांना Covaxin देण्याबाबत DCGI ची अद्याप मंजुरी नाही; मूल्यमापन प्रक्रिया सुरू; MoS Health, Dr Bharati Pawar यांची माहिती.

लसवंत भारतीयांना कोणत्या देशात आहे परवानगी?

  • अमेरिका: अमेरिकेमध्ये आता नोव्हेंबर 2021 पासून दोन्ही लसीचे डोस घेतल्यांना प्रवेशाची मुभा आहे. भारतासह 33 देशातील प्रवासी आता अमेरिकेला जाऊ शकतात.
  • युके : युके मध्येही कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना आता प्रवासाची मुभा आहे. याकरिता 10 दिवस क्वारंटीनची गरज नाही.
  • कॅनडा: कॅनडा मध्येही लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या भारतीयांना प्रवेश दिला जात आहे.
  • जर्मनी: जर्मनी मध्येही लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आणि कोविड 19 निगेटीव्हचा रिपोर्ट असलेल्यांना प्रवेश दिला जात आहे.
  • इटली : इटली मध्येही आता ग्रीन कार्ड साठी लसवंत भारतीय अर्ज करू शकतात. कोविशिल्ड या भारतीय लसीला देखील आता इटलीने परवानगी दिल्याने भारतीय प्रवासांचा इटली मध्ये प्रवेश सुकर झाला आहे.
  • UAE:जागतिक आरोग्य संघटनेकडून हिरवा कंदील मिळवलेल्या लस घेतल्या असतील तर आता युएई मध्येही परदेशी नागरिकांना प्रवेश आहे.
  • फ्रांस: फ्रांस मध्येही लसीचे दोन्ही डॉस घेतलेल्यांना परवानगी आहे तसेच लस घेतली नसल्यास 72 तास आधीचा कोविड निगेटीव्ह रिपोर्ट सादर करावा लागणार आहे.

केनिया, स्पेन देखील लसवंत भारतीयांना प्रवेश देत आहेत. सध्या जगभरात कोविड 19 ची लागण झालेल्यांमध्ये 238.2 मिलियन लोकांचा समावेश आहे. 6.49 बिलियन लोकं लसवंत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement