IPL Auction 2025 Live

Coronavirus: कोरोना व्हायरस आणि Lockdown काळात प्रवास करताना काय काळजी घ्याल?

मात्र, आपण तो कोणत्या स्थिती आणि कोणत्या पद्धतीने करत असतो यावर बरेच काही अवलंबून असते. प्रवासाच्या कारणावरही प्रवासातील आनंद अवलंबून असतो. प्रत्येक प्रवास हा काही ना काही कारणामुळेच केला जातो. त्यामुळे कारण नसताना केलेला प्रवास अनेकदा कंटाळवाना असू शकतो.

Travel | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus संकट निपटण्यासाठी देशभर लॉकडाऊन (Lockdown)  सुरु आहे. अशा स्थितीत प्रवास टाळणे हे केव्हाही चांगले. पण, अगदीच अतिमहत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करायची वेळ आलीच तर किंवा नेहमीच्या प्रवासातही काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ज्यामुळे स्वत:च्या आरोग्या काळजी तर घेतली जाणार आहेच. परंतू, आपल्यासोबत आपला परिवार आणि सोबतीच्या सहकप्रवाशाच्याही आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. कोणत्याही संसर्गापासून आपला बचाव होणार आहे. तसेच, आपला प्रवास आनंदाचा आणि सुखकरही होणार आहे. त्यामुळे जाणून घ्या प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी.

संसर्ग आणि अॅलर्जी

काही नागरिकांना काही गोष्टींची अॅलर्जी असते. काहींना स्वत:लाच आजार असतात. अशा वेळी तोंडाला मास्क लावणे, हातात हातमोजे घालने केव्हाही चांगले. शिंकताना, खोकताना, खाजवताना (जखम असल्यास) विशेष काळजी घ्यावी. आपल्यामुळे सहप्रवासी अथवा सहप्रवाशामुळे आपल्याला कोणताही संसर्ग, अॅलर्जी होणार नाही, याची दक्षता घ्या.

खाणे पिणे (Concentrate on eating)

प्रवास करताना आपल्या आहाराकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे असते. यात पाणी, जेवण, नाश्ता, तसेच प्रवासादरम्यान घेतले जाणारे खाद्यपदार्थ याकडे विशेष लक्ष द्या. जेवण शक्यतो योग्य ठिकाणी आणि वेळेवर घेण्याचा प्रयत्न करा. (हेही वाचा, उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी ही आहेत भारतातील काही हटके आणि स्वस्त ठिकाणे)

औषध (Medicines)

आपल्याला होत असलेल्या त्रासास अनुसरुन आवश्यक ती औषधं सोबत घ्या. अनेकदा आपल्या डॉक्टरनी दिलेली औषधं विशिष्ठ ठिकाणीच मिळतात. त्यामुळे प्रवासात ती संपल्यास, अथवा विसरल्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुरशा प्रमाणात आवश्यक ती औषधं सोबत ठेवा.

बँग आणि सामना (Bag)

आपण कोणत्या प्रकारचा प्रवास करतो आहे. तो का करतो आहे याचा पहिल्यांदा विचार करा. त्यानुसारच प्रवासात आवश्यक ते सामना घ्या. नाहितर उगाज ओझं घ्याल तर प्रवासभर वैताग आणि चिडचिड करुन घ्याल. प्रवासात कमी साहित्य असणं केव्हाही चांगले.

काळजी घ्या

प्रवासात एकटे असाल तर सतत जागृक राहा. जर कुटुंब अथवा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक सोबत असतील तर विशेष काळजी घ्या. त्यांच्या जेवण, व्यक्तिगत स्वच्छता, सवयी यांची माहिती करुन घ्या. प्रवासात त्याबाबत ठराविक काळानंतर त्यांना विचारत राहा. गर्दीत अथवा स्टेशनवर उतरल्यावर ते खालीच राहणार नाहीत याची काळजी घ्या.

सावधानता (Be Carefull)

प्रवास करताना नेहमीच वेगवेगळे लोक भेटत असतात. पटकण कोणावरही विश्वास ठेऊ नका. ओळख समजून घ्या. व्यक्तिगत, खासगी गौष्टी, आर्थिक व्यवहार, गुन्हेगारी, भांडण आदी गोष्टींवर चर्चा टाळा. गरज नसेल तर उगाच परिचय करुन देऊ नका. नको त्या लोकांना कारणाशिवाय सलगी दाखवू नका.

कोणताही प्रवास असला तरी, योग्य काळजी घेतल्यास तो आनंददायीच होत असतो. मात्र, आपण तो कोणत्या स्थिती आणि कोणत्या पद्धतीने करत असतो यावर बरेच काही अवलंबून असते. प्रवासाच्या कारणावरही प्रवासातील आनंद अवलंबून असतो. प्रत्येक प्रवास हा काही ना काही कारणामुळेच केला जातो. त्यामुळे कारण नसताना केलेला प्रवास अनेकदा कंटाळवाना असू शकतो.