प्रवाशांना रेल्वे आरक्षण यादी आता ऑनलाईन पाहता येणार
रेल्वे प्रशासनाने आता प्रवाशांनी बुक केलेल्या तिकिटांच्या आरक्षणाची यादी (Reservation List) आता त्यांना ऑनलाईन पाहता येणार असल्याची घोषणा केली आहे.
रेल्वे प्रशासनाने आता प्रवाशांनी बुक केलेल्या तिकिटांच्या आरक्षणाची यादी (Reservation List) आता त्यांना ऑनलाईन पाहता येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशासांना त्यांनी बुक केलेल्या रेल्वेची सद्यस्थिती कळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
प्रवाशांना ऑनलाईन रेल्वे आरक्षणाची यादी http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. त्याचसोबत प्रवाशांना गाडीच्या डब्याची माहितीसह 'बर्थ' नुसार तपशील प्रवाशांना ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार असल्याची माहिती पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी दिली आहे.(हेही वाचा-होळी आणि महाशिवरात्र 2019 साठी कोकणात जाणाऱ्यांना खुशखबर! 10 विशेष ट्रेन्सचं बुकिंग 26 फेब्रुवारीपासून होणार सुरु)
ऑनलाईन पद्धतीने यादी पाहण्याची सोय आता सर्व रेल्वेसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच आरक्षित असलेल्या जागा आणि रिकाम्या जागा ह्या वेगवेगळ्या रंगांमधून दाखवण्यात येणार आहे. त्याचसोबत मोबाईल इंटरनेटची सुविधा ही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. येत्या 20 दिवसात ही सुविधा राजधानी आणि शताब्दी रेल्वेगाड्यांसाठी सुरु करण्यात येणार आहे.