Apli PMPML App Features: पुणेकरांसाठी ऑनलाईन तिकीट खरेदी, बस ट्रॅकिंग, दैनिक पास हाताच्या बोटांवर; 'आपली पीएमपीएमएल' ॲपची खास वैशिष्ट्ये; घ्या जाणून

पुणेकर नागरिक आणि वापरकर्त्यांसाठी हे ॲप डाउनलोड करण्यासाठी Google Play Store वर उपलब्ध आहे. पीएमपीएमएलने विश्वास व्यक्त केला आहे की, हे ॲप पुणे शहरातील आणि या शहरात प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी क्रांतीकारी ठरु शकते.

Apli PMPML App | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

“Apli PMPML” हे नवीन मोबाईल ॲप, पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने नुकतेच लॉन्च केले. पुणेकर नागरिक आणि वापरकर्त्यांसाठी हे ॲप डाउनलोड करण्यासाठी Google Play Store वर उपलब्ध आहे. पीएमपीएमएलने विश्वास व्यक्त केला आहे की, हे ॲप पुणे शहरातील आणि या शहरात प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी क्रांतीकारी ठरु शकते. हे केवळ ॲप नव्हे तर, ते सर्व प्रवाशांसाठी शहरातील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ आणि तिकीट उपलब्ध करुन देणारी प्रणाली आहे. ज्यामुळे प्रवाशांना केवळ तिकीटच नव्हे तर, वेगवेगळ्या प्रवासी सेवांना आकारले जाणारे शुल्क, रस्त्यांचे जाळे आणि इतर बरीच माहिती उपलब्ध होऊ शकेल. जाणून घ्या या ॲपची खास वैशिष्ट्ये.

‘Apli PMPML’ मोबाईल ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये:

बस मार्ग आणि सर्वसमावेशक तपशील

प्रवाशांना त्यांचे निघण्याच्या ठिकाणापासून त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी आवश्यक मार्ग, वाहतूक सेवा, मार्ग यांबाबत संपूर्ण माहिती या ॲपद्वारे मिळू शकते. ज्यामध्ये बस, मेट्रो आणि इतर सेवांचाही समावेश आहे. (हेही वाचा, Apli PMPML App काय आहे? त्याचा वापर, फायदा आणि उपयुक्तता घ्या जाणून)

ऑनलाईन बस ट्रॅकिंग

Apli PMPML ॲप द्वारा प्रवासी, नागरिक बसचे निश्चित ठिकाणही पाहू शकतात. ऑनलाईन ट्रॅकरच्या सहाय्याने रिअल-टाइम अपडेट पर्याय उपलब्ध असल्याने प्रवाशांना त्यांच्या वेळेचे योग्य व्यवस्थापन करता येणे शक्य होणार आहे. (हेही वाचा, 'Apli PMPML' Mobile App: पुणेकरांना दिलासा! लाँच झाले ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप; जाणून घ्या कशी होईल मदत)

ऑनलाइन तिकीट खरेदी

गर्दी, घाईगडबड अशा वेळी अनेक प्रवाशांना प्रवासादरम्यान आकारलेले शुल्क देऊन तिकीट काढता येत नाही, किंवा त्यास विलंब होतो. कधी कधी सुट्ट्या पैशांवरुन वाहक आणि प्रवासी यांच्यात वाद निर्माण होता. या ॲपमुळे हा वाद टळणार आहे. कारण, याद्वारे प्रवासी यूपीआय पेमेंट पर्याय वापरून ॲपद्वारे बस तिकीट ऑनलाइन खरेदी करू शकतात. (हेही वाचा: Ganeshotsav 2024: गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात 10 दिवस दारूबंदीचा प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे शहराचे लक्ष)

दैनिक पास उपलब्ध

शहर अथवा पीएमपीएमएलने निश्चित करुन दिलेल्या सीमांचे अनुकरण करुन त्या कार्यक्षेत्रातील प्रवासासाठी प्रवासी ॲपचा वापर करुन दैनिक पासही काढू शकतात. जे 40 रुपये, 50 रुपये आणि 120 रुपये किमतीचे आहेत. या किंमतीचे हे दैनिक पास थेट ॲप प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत, ज्यामुळे दैनंदिन प्रवास अधिक परवडणारा आणि त्रासमुक्त होतो.

तक्रार नोंदणी आणि निवारण

अनेकदा बस वाहतूक सेवेबद्दल प्रवाशांना तक्रार असते. परंतू, वेळेअभावी किंवा तक्रार निश्चित कोठे दाखल करायची याबाबत माहिती नसल्याने अडचण निर्माण होते. या ॲपमुळे हा गुंता सुटणार आहे. इतकेच नव्हे तर ॲपद्वारे तक्रार ऑनलाईन पद्धतीने करताही येणार आहे.

ॲप कोठून कराल डाऊनलोड?

हे ॲप आपण गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करु शकता. तसेच, येथे क्लिक करुनही आपण हे ॲप  डाऊनलोड करण्यासाठी संबंधित संकेतस्थळावर पोहोचू शकता.

ॲप केवळ बस वाहतूकच नव्हे तर त्यासोबतच मेट्रो तिकीट खरेदी करण्याची सुविधा देखील देते. ज्यामुळे ते पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी सर्वसमावेशक उपाय ठरु पाहात आहे.

दरम्यान, हे ॲप नवे असले तरी, पुणेकर त्याला जोरदार प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत हजारो लोकांनी हे ॲप डाऊनलोड तर केले आहेच. शिवाय त्याला रेटींगही चांगले दिले आहे. त्याची कामगिरी कशी आहे हे येत्या काही दिवसांमध्येच कळणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif