Malaysia Visa Free Entry: मलेशियाकडून भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर; आता 1 डिसेंबर पासून करू शकणार व्हिसा-मुक्त प्रवेश, जाणून घ्या सविस्तर

मलेशियामध्ये सुमारे 1 लाख 30 हजार भारतीय स्थलांतरित काम करतात. मलेशियामध्ये ज्या देशांतून सर्वाधिक पर्यटक येतात, त्यात भारत सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे ज्या देशांतून सर्वाधिक पर्यटक भारतात येतात, त्यात मलेशियाही सहाव्या क्रमांकावर आहे.

Malaysia. (Photo Credit: Pixabay)

कोविड-19 महामारीच्या समाप्तीनंतर आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक देशांनी पर्यटनाला चालना देण्यास सुरुवात केली. आता मलेशियाने (Malaysia) यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. मलेशियाने रविवारी सांगितले की, ते 1 डिसेंबरपासून भारतातील अभ्यागतांना 30 दिवस व्हिसा-मुक्त (Visa Free Entry) राहण्याची परवानगी देतील. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी जाहीर केले आहे की भारतीय नागरिक 1 डिसेंबरपासून व्हिसाशिवाय मलेशियामध्ये येऊ शकतात आणि 30 दिवस राहू शकतात. हा नियम चीनी नागरिकांसाठीही लागू आहे. चीन आणि भारत हे मलेशियाचे चौथे आणि पाचवे मोठे व्यापारी भागीदार आहेत.

श्रीलंका आणि थायलंडनंतर, मलेशिया हा भारतीय नागरिकांना व्हिसा-मुक्त प्रवासाला परवानगी देणारा तिसरा आशियाई देश आहे. सध्या, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत, संयुक्त अरब अमिराती, इराण, तुर्की आणि जॉर्डन येथील प्रवाशांसाठी व्हिसा सूट उपलब्ध आहे. मलेशियाचे पंतप्रधान म्हणाले की भारतीय आणि चिनी नागरिकांना व्हिसा सूट सुरक्षा मंजुरीच्या अधीन असेल. ते म्हणाले की, गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या आणि हिंसाचाराला प्रवण असलेल्या लोकांना व्हिसा मिळणार नाही.

मलेशिया सरकारच्या आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारी ते जून दरम्यान भारतातून 283,885 पर्यटक आले. 2019 मध्ये याच कालावधीत भारतातून 354,486 पर्यटक मलेशियामध्ये आले होते. भारताने 1957 मध्ये मलेशियाशी (तेव्हाचे मलाया) राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. मलेशियामध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या सुमारे 27 लाख 50 हजार आहे, जी तेथील लोकसंख्येच्या सुमारे नऊ टक्के आहे. भारतीय वंशाचे 90 टक्के लोक तामिळ भाषिक आहेत. बाकीचे तेलुगु, मल्याळम, पंजाबी, बंगाली, गुजराती, मराठी आणि इतर भाषा बोलतात.

मलेशियामध्ये सुमारे 1 लाख 30 हजार भारतीय स्थलांतरित काम करतात. मलेशियामध्ये ज्या देशांतून सर्वाधिक पर्यटक येतात, त्यात भारत सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे ज्या देशांतून सर्वाधिक पर्यटक भारतात येतात, त्यात मलेशियाही सहाव्या क्रमांकावर आहे. त्याच वर्षी सुमारे 3.25 लाख मलेशियन पर्यटक भारतात आले होते. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2010 मध्ये मलेशिया दौऱ्यावर असताना पर्यटनाबाबत करार केला होता. (हेही वाचा: Thailand Waives Visas for Indians: भारतीय प्रवाशांसाठी खुशखबर! आता थायलंडला जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, आता भारतीय नागरिकांना 19 देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तुम्ही व्हिसाशिवाय 19 देशांमध्ये जाऊ शकता. याशिवाय, परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार , 26 देशांमध्ये भारतीयांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा उपलब्ध आहे. 25 देशांसाठी ई-व्हिसा घ्यावा लागेल आणि 11 देशांमध्ये प्रवेशासाठी व्हिसा ऑन अरायव्हल किंवा ई-व्हिसा यापैकी एक निवडता येईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now