IRCTC Summer Special Trains 2019: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी भारतीय रेल्वेची खास 'समर स्पेशल ट्रेन्स'ची सुविधा; पहा यादी
त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुट्ट्यांमध्ये होणारी अति गर्दी टाळण्यासाठी भारतीय रेल्वे समर स्पेशल ट्रेन्सची सुविधा उपलब्ध केली आहे.
काही दिवसातच मुलांच्या परीक्षा संपतील आणि फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनतील. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुट्ट्यांमध्ये होणारी अति गर्दी टाळण्यासाठी भारतीय रेल्वे समर स्पेशल ट्रेन्सची सुविधा उपलब्ध करते. देशभरात ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेच्या विविध झोन्सने यंदा समर स्पेशल ट्रेन्सचे आयोजन केले आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने 19 तर साऊथ सेंट्रल रेल्वे 25 स्पेशल ट्रेन्सचे आयोजन केले आहे. जाणून घेऊया कोणकोणत्या आहेत समर स्पेशल ट्रेन्स....
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेने उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनिमित्त 18 विशेष ट्रेन्सची सुविधा केली आहे. यात मुंबई सेंट्रल- लखनऊ जं., वांद्रे-गाझियापूर सिटी स्पेशल ट्रेन आणि इत्यादींचा समावेश आहे. या स्पेशल ट्रेन्स मुंबई, उधा, अहमदाबाद, गांधीधाम आणि इंदोरपासून देशातील विविध भागात म्हणजेच नवी दिल्ली, जम्मू तावी, जयपूर, अजमेर, पटना, गोरखपूर, अमृतसर, चापरा, आग्रा आणि मंगलोर इत्यादी भागात धावतील. या ट्रेन्सची बुकींग 2 एप्रिल 2019 पासून सुरु झाली आहे. 120 दिवस आधी तुम्ही सर्व पीआरएस काऊंटर आणि आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन अॅडव्हान्स बुकींग करु शकता.
IRCTC ट्विट:
साऊथ सेंट्रल रेल्वे
साऊथ सेंट्रल रेल्वेने 25 समर स्पेशल ट्रेन्सचे आयोजन केले आहे. या ट्रेन्स संबलपूर-बनसवाडी पर्यंत धावतील. दरम्यान या गाड्या बारगढ रोड, बोलंगीर, तिलगढ जं, केसिंगा, रायगड, विजयनगरम, विशाखापट्टणम, दुव्वदा, सामलकोट, राजमंदरी, विजयवाडा या स्थानकांवरही थांबतील.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी 96 विशेष ट्रेन्सची सुविधा सुरु केली आहे. या विशेष ट्रेन्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, लोकमान्य टिळक टर्मिनल्स आणि वाराणसी, नागपूर या स्थानकातून सुटणार आहेत.
यात लोकमान्य टिळक टर्मिनल्स-बरौनी वीकली स्पेशल, लोकमान्य टिळक टर्मिनल्स- वाराणसी वीकली सुविधा स्पेशल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स-नागपूर वीकली स्पेशल्स, छत्रपती शिवाजी महारज टर्मिनल्स-गोरखपूर वीकली सुपरफास्ट स्पेशल, लोकमान्य टिळक टर्मिनल्स-मांडुआडीह वीकली स्पेशल्स आणि पुणे मांडुआहीड वीकली स्पेशल या ट्रेन्सचा समावेश आहे.
IRCTC ट्विट:
दक्षिण रेल्वे
दक्षिण रेल्वेने निलगिरी या समर स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. ही ट्रेन मेटतुपालयम ते उधगममंडलम आणि पुन्हा निलगिरी माऊंटन पर्यंत प्रवास करेल. यात कल्लर, हिलग्रोव्ह, कुनूर, वेलिनटॉन, अरवंकडु, केट्टी, आणि लवदेले या स्थानकांचा सहभाग असेल.