IRCTC Nepal Tour Package: नवीन वर्षात नेपाळला भेट देण्यासाठी आयआरसीटीसीने आणले खास टूर पॅकेज; मुंबईवरून होणार सुरु, जाणून घ्या सविस्तर

नेपाळ हा देश आपली सभ्यता, संस्कृती तसेच नैसर्गिक सौंदर्यामुळे जगभरात खूप लोकप्रिय आहे. येथील माउंट एव्हरेस्ट पर्वतावर दरवर्षी जगभरातून मोठ्या संख्येने साहसी पर्यटक येतात.

IRCTC (PC - Facebook)

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. जर तुम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने एखाद्या सुंदर देशाला भेट देण्याचा विचार करत असाल, तर एक चांगली बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला आयआरसीटीसीच्या (IRCTC) एका अतिशय अप्रतिम टूर पॅकेजबद्दल सांगणार आहोत. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्हाला नेपाळला (Nepal) भेट देण्याची संधी मिळणार आहे. नेपाळ हा देश आपली सभ्यता, संस्कृती तसेच नैसर्गिक सौंदर्यामुळे जगभरात खूप लोकप्रिय आहे. येथील माउंट एव्हरेस्ट पर्वतावर दरवर्षी जगभरातून मोठ्या संख्येने साहसी पर्यटक येतात. याशिवाय नेपाळमध्ये अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, जी जगभरातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र असतात.

आयआरसीटीसीचे हे टूर पॅकेज 9 जानेवारी 2024 रोजी मुंबई विमानतळावरून सुरू होत आहे. हे फ्लाइट टूर पॅकेज आहे. त्याचे नाव MYSTICAL NEPAL EX MUMBAI (WMO018) आहे. हे टूर पॅकेज एकूण 5 रात्री आणि 6 रात्री दोन्हीसाठी आहे. प्रवास करताना जेवणापासून निवासापर्यंत सर्व व्यवस्था आयआरसीटीसीकडून केली जाईल. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला विम्याची सुविधाही मिळत आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला काठमांडू आणि पोखरा येथील सुंदर ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल.

खर्च-

या टूर पॅकेजमध्ये प्रति व्यक्ती दर 52,300 रुपये आहे. दोन लोकांसह प्रवास केल्यास प्रति व्यक्ती दर 44,800 रुपये आहे. जर तुम्ही तीन लोकांसह प्रवास करणार असाल, तर प्रति व्यक्ती दर 44,100 रुपये आहे. (हेही वाचा: 8th Wonder of the World: इटलीच्या Pompeii ला मागे टाकत कंबोडियातील Angkor Wat Temple बनले जगातील 8 वे आश्चर्य; जाणून घ्या काय आहे खास)

टूरची तारीख-

09.01.2024 ते 14.01.2024

12.02.2024 ते 17.02.2024

04.03.2024 ते 09.03.2024

पॅकेजमध्ये समाविष्ट गोष्टी-

मुंबई ते काठमांडू आणि परत मुंबईसाठी इंडिगो एअरलाइनने विमान प्रवास प्रवासक्रमानुसार 5 नाश्ता आणि 5 रात्रीचे जेवण

एसी डिलक्स कोचद्वारे प्रवास

नेपाळमध्ये एक स्थानिक इंग्रजी बोलणारा टूर मार्गदर्शक

03 रात्री काठमांडू निवास आणि 02 रात्री पोखरा निवास

प्रवास विमा (केवळ 60 वर्षांखालील प्रवाशांसाठी)