How To Reach Shirdi Sai Baba Mandir: शिर्डी साईबाबा मंदिरापर्यंत पोहोचायचे कसे? ट्रेन, विमान तसेच लोकल वाहतुकीचे 'हे' आहेत सोप्पे मार्ग
शिर्डीला जाण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ट्रेन, फ्लाइट, टॅक्सी किंवा कॅब इत्यादीने जाऊ शकता. साई मंदिरापासून रेल्वे स्टेशन १० किमी अंतरावर आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही परिवहन बसनेही शिर्डीला जाऊ शकता.
How To Reach Shirdi Sai Baba Mandir: शिर्डीचे साई मंदिर (Sai Baba Mandir) जगभर प्रसिद्ध असून, येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. शिर्डी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. साई मंदिराशी संबंधित इतरही अनेक मंदिरे येथे आहेत. असे मानले जाते की, साईबाबा कधीही त्यांच्या भक्तांना निराश करत नाहीत. साईंच्या दरबारातून कोणताही भक्त रिकाम्या हाताने परतत नाही. कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. तुम्हीही पहिल्यांदाच साई मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. शिर्डीला कसे पोहोचायचे, कुठे मुक्काम करायचा? यासंदर्भात आम्ही तुम्हाला या लेखातून माहिती देणार आहोत.
शिर्डी साईबाबा मंदिरात कसे पोहोचायचे?
शिर्डीला जाण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ट्रेन, फ्लाइट, टॅक्सी किंवा कॅब इत्यादीने जाऊ शकता. साई मंदिरापासून रेल्वे स्टेशन १० किमी अंतरावर आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही परिवहन बसनेही शिर्डीला जाऊ शकता. शिर्डीत राहण्यासाठी हॉटेल्सची कमतरता नाही. कमी बजेटमध्येही तुम्हाला इथे हॉटेल्स मिळतील. साई मंदिर परिसरात तुम्हाला चांगली आणि स्वच्छ हॉटेल्स मिळू शकतात. शिर्डीमध्ये साईबाबांच्या नावावर ट्रस्ट देखील आहे, तुम्ही या ठिकाणी देखील राहू शकता. (हेही वाचा - Kailash Mansarovar Yatra: शिवभक्तांसाठी खुशखबर! लवकरच सुरु होऊ शकते कैलास मानसरोवर यात्रा, भारत आणि चीनमध्ये झाला मोठा करार)
विमानाने शिर्डीला कसे जायचे?
औरंगाबाद विमानतळ हे शिर्डीला सर्वात जवळचे विमानतळ आहे. औरंगाबादला आल्यानंतर तुम्हाला शिर्डीसाठी बस मिळेल. शिर्डीपासून औरंगाबाद विमानतळ 96 किमी आहे. त्यामुळे तुम्ही फ्लाइटचाही पर्याय निवडू शकता.
ट्रेनने शिर्डीला कसे जायचे?
शिर्डीसाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक आहे. हे देशातील बहुतेक प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहे.
शिर्डीत लोकल वाहतूक -
शिर्डीत पर्यटक कॅब, टॅक्सी आणि बस हे वाहतुकीचे मुख्य साधन आहेत. शहरामध्ये प्रवास करण्यासाठी बस हा सर्वोत्तम मार्ग आहे. याशिवाय, हेलिकॉप्टर त्यांनी व्यवस्थापित केलेल्या हेलिपॅडवर उतरवण्यासाठी श्री साई संस्थान मंदिराची परवानगीही घेता येते. हेलिपॅडपासून मुख्य मंदिर फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे.
दर गुरुवारी साईबाबांची पालखी -
तुम्ही वर्षभरात कधीही साईंच्या दर्शनासाठी जाऊ शकता, परंतु विशेषतः ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ मानला जातो. गर्दी टाळायची असेल तर सोमवार किंवा शुक्रवारी जाऊ शकता. येथे दर गुरुवारी साईबाबांची पालखी काढली जाते, या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. तुम्ही साई दर्शन ऑनलाईन देखील बुक करू शकता. यासाठी तुम्ही शिर्डी दर्शनासाठी @online.sai.org.in बुक करू शकता.
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2024 04:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

