Haffkine Heritage Walk: मुंबईतील हाफकिन इंस्टिट्युटमध्ये हेरिटेज वॉक, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढांची महत्वपूर्ण माहिती
मुंबईतील ऐतिहासिक ठिकाण असलेलं हाफकिन इंस्टिट्युटमध्ये देखील हेरिटेज वॉकला सुरुवात करण्यात आली आहे.
मुंबई (Mumbai) शहरात बऱ्याच ऐतिहासकाली वास्तु आहेत. किंबहुना युनेस्कोने (UNESCO) नामांकित केलेल्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स (World Heritage Site) पैकी राज्यातील तिनं स्थळ फक्त एकट्या मुंबईत आहे. अशीचं मुंबईत आणखीही ऐतिहासीक ठिकाण (Historical Place) आहे जी आपण कायम चित्रात, फोटोत बघतो किंवा पुस्तकात वाचतो पण तिथे भेट देणं अवघडचं. अशाचं काही मुंबईतील ऐतिहासिक वास्तुंच्या पर्यटनासाठी राज्य पर्यटन विभागाकडून (Maharashtra Tourism Department) काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. गेल्या वर्षिच मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) हेरिटेज वॉकला (Heritage Walk) सुरुवात करण्यात आली. म्हणजे मुंबईत किंवा महाराष्ट्राचे रहिवासी असुन देखील आपण कायम ऐकतो मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला तो निर्णय दिला पण वास्तविकतेत सर्वसामान्यांनी मुंबई उच्च न्यायालय कधीही बघितलं नाही. त्यासाठीचं गेले वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या हेरिटेज वॉकला (Haffkine Heritage Walk) सुरुवात करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court Heritage Walk) हेरिटेज वॉकचा प्रतिसाद बघता आता मुंबईतील ऐतिहासिक ठिकाण (Mumbai Historical Place) असलेलं हाफकिन इंस्टिट्युटमध्ये (Haffkine Heritage Walk) देखील हेरिटेज वॉकला सुरुवात करण्यात आली आहे. तरी ऐतिहासिक प्रेमी, पर्यटक आणि मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण हाफकिन इंस्टिट्युट (Haffkine Institute) हे मुंबईतील (Mumbai) नाही तर देशातील सर्वात जुन्या बायोमेडिकल संशोधन संस्थांपैकी एक आहे. किंबहुना १८९९ साली हाफकिन इंस्टिट्युटची स्थापना करण्यात आली होती. (हे ही वाचा:- Mumbai: छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयाच्या जीर्णोद्धाराला UNESCO उत्कृष्टता पुरस्कार जाहीर)
हाफकिन इंस्टिट्युटमध्ये देखील हेरिटेज वॉकला 27 नोव्हेंबर म्हणजे काल पासून सुरुवात करण्यात आली आहे. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक विकेंडला असेल. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त एका तासाचा असेल. या टूरची तिकिटं bookmyshow.com वर बुक करता येतील.", अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.