Mumbai Alibag Cruise : आता आशियातील हायस्पीड क्रूझने करा मुंबई अलीबाग प्रवास

आगामी नवीन वर्षाच्या सुरूवाती पासून मुंबई ते काशीद - दिघी अशी नवी हायस्पीड क्रूझ (Highspeed Cruise) सुरु करण्यात येणार आहे.

Seaside Mumbai | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात समुद्रकिनारी पर्यटनाला जायचं असल्यास अलिबाग (Alibag) ही नागरिकांची पहिली पसंती आहे. कारण मुंबई (Mumbai) पासून अलीबाग हे अंतर फार कमी आहे. तसेच सध्या मुंबई ते अलीबाग प्रवासासाठी असलेल्या फेरीतून अवघ्या 45 मिनिटांमध्ये मुंबई अलीबाग हे अंतर पार करता येत. पण आता रायगड (Raigad) जिल्ह्याच्या पर्यटनात आशियातील सर्वात सुसाट क्रूझची (Cruise) एन्ट्री होणार आहे. आगामी नवीन वर्षाच्या सुरूवातीपासून मुंबई ते काशीद - दिघी अशी नवी हायस्पीड क्रूझ (Highspeed Cruise) सुरु करण्यात येणार आहे. ही क्रूझ आशियातील पहिली भारतीय हायस्पीड क्राफ्ट रो -पेक्स क्रूझ असणार आहे. कोकण गौरव क्रूझमुळे (Konkan Gaurav Cruise) कोकण पर्यटनास (Konkan Tourism) विशेष चालना मिळणार आहे.

 

कोकण गौरव क्रूझच्या एका फेरीतून 260 प्रवासी, 20 कार आणि 11 मोटारसायकल नेता येणार आहेत. नव्याने दाखल होणारी ही हायस्पीड क्रूझ कोकणात (Konkan) आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन (International Tourism) घडविण्यासाठी मदतीची ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. रायगड (Raigad) जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील काशीद(Kashid), अलिबाग (Alibag), श्रीवर्धन (Shrivardhan) येथील हरिहरेश्वर (Harihareshwar) आणि दिवेआगार हे समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षण आहे. कोकण गौरव या क्रूझमुळे हे सगळे समुद्र किनारे अगदी कमी वेळात गाठनं शक्य होणार आहे. कोकण गौरव या क्रूझची उत्सुकता फक्त कोकणवासियांनाचं नाही तर संपूर्ण राज्याला लागली आहे. ( हे ही वाचा:-World’s Greatest Places of 2022: टाईमने जाहीर केली जगातील 'सर्वोत्तम 50 ठिकाणांची' यादी; भारतातील 'या' दोन स्थळांचा समावेश, जाणून घ्या लिस्ट)

 

कोकण गौरव क्रूझ सेवेची घोषणा मुंबईतील एका विशेष कार्यक्रमात करण्यात आली. या कार्यक्रमाला रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर ( Dr Mahendra Kalyankar) , गौरव क्रूझ प्रायव्हेट लिमिटेडचे (Gaurav Cruise Private Limited) मुख्य प्रवर्तक आणि संचालक गौतम प्रधान (Gautam Pradhan), महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर (Mahendra Life Space Developer) आणि महिंद्रा हॉलिडे अँड रिसॉर्टस (Mahendra Holiday and Resort Limited) लिमिटेडचे चेअरमन अरुण नंदा (Arun Nanda) यांची उपस्थित होती. सध्या मुंबई ते अलिबाग प्रवासासाठी फेरी उपलब्ध आहेत. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात ही फेरी सुविधा उपलब्ध असली तरी कोकण गौरव क्रूझ ही कोकण पर्यटनात विशेष भर घालणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif