भारतामध्ये आहेत Nude Beaches? देशातील अशी काही खास ठिकाणी जिथे आढळतात Nudists लोक; मात्र देशात Naturism ला परवानगी आहे?
केरळ, गोवा अशी राज्ये तर तिथल्या समुद्रकिनाऱ्यामुळेच लोकप्रिय आहेत. मात्र आपण कधी समुद्रकिनाऱ्यावर नग्न (Nude) फिरण्याचा विचार केला आहे? मऊशार वाळू, पाण्याचा लाटा, मोकळा निसर्ग असा वातावरणात नग्नावस्थेमध्ये (Nudism) समुद्राची मजा घेण्याचा आनंद काही औरच
भारताला फार मोठ्या लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. केरळ, गोवा अशी राज्ये तर तिथल्या समुद्रकिनाऱ्यामुळेच लोकप्रिय आहेत. मात्र आपण कधी समुद्रकिनाऱ्यावर नग्न (Nude) फिरण्याचा विचार केला आहे? मऊशार वाळू, पाण्याचा लाटा, मोकळा निसर्ग असा वातावरणात नग्नावस्थेमध्ये (Nudism) समुद्राची मजा घेण्याचा आनंद काही औरच. परदेशात, मुख्यत्वे युरोपियन देशांमध्ये नग्न समुद्रकिनारे ही संकल्पना जास्त प्रमाणात आढळते. मात्र भारतामधील वातावरण पाहता नग्न समुद्र किनाऱ्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. परंतु भारतामध्ये असे काही समुद्रकिनारे आहेत, जिथे नग्नवादी लोक मुक्तपणे आनंद घेतात.
तर आपल्यालाही पूर्ण कपडे काढून मुक्तपणे समुद्राचा आनंद घ्यायचा असेल, तर आम्ही काही सिक्रेट न्यूडिस्ट बीच किंवा भारतातील निर्जन समुद्रकिनाऱ्यांची यादी देत आहोत. पण मग असा प्रश्न आहे की भारतात न्यूडिजमला परवानगी आहे का?
ओम बीच (Om Beach) -
कर्नाटकच्या मनमोहक अशा गोकर्ण भागात वसलेले 'ओम बीच' एक आश्चर्यकारक ठिकाण आहे. या बीचचा आकार ओमच्या प्रतीकासारखा असल्याने त्याचे नाव ओम बीच असे पडले. इतर किनाऱ्याच्या तुलनेत हा बीच थोडा हिडन असल्याने इथे फार कमी पर्यटक असतात. सनबाथसाठी हा बीच लोकप्रिय आहे.
अगाटी बेट (Agatti Island) -
लक्षद्वीपमधील अगाटी बेट हे देशातील एक स्वर्गीय ठिकाण आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेले सौंदर्य आणि स्फटिकासारखे निळे पाणी यामुळे नेहमीच इथे पर्यटक आकर्षित होतात. या ठिकाणीही नग्नवादी लोक मोकळ्या वातावरणात समुद्राचा आनंद घेताना दिसून येतात.
ओझरान बीच, गोवा (Ozran Beach, Goa) -
कदाचित तुम्ही गोव्यातील या समुद्रकिनार्याचे नावही ऐकले नसेल. गोव्यातील इतर लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यापासून हा बीच थोडा दूर आहे. मात्र गोव्यात येणाऱ्या बऱ्याच परदेशी लोकांमध्ये हा बीच एक लोकप्रिय ठिकाण म्हणून ओळखले जाते. या बीचवरही अनेक पर्यटक नग्नावस्थेमध्ये फिरत असतात. (हेही वाचा: फक्त एका जपानी पर्यटकासाठी Peru देशाने उघडले आपले प्रसिद्ध पर्यटन स्थळ 'माचू पिच्चू'; 6 महिने पहावी लागली वाट, जाणून घ्या कारण)
मरारी बीच (Marari Beach) -
View this post on Instagram
A post shared by PeacockVilla & ArtCafe Marari🦚 (@peacockvilla_artcafe) on
केरळचे बॅकवॉटर्सने नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत आले आहेत. परंतु मरारी बीच हा असा हिडन समुद्र किनार आहे जिथे तुम्ही निसर्गाचे सुंदर सौंदर्य अनुभवू शकता. या बीचवर स्थानिक किंवा इतर पर्यटकांची गर्दी नसल्याने इथे न्यूडिस्ट लोकांची गर्दी असते.
दरम्यान, हे देशातील काही जास्त लोकप्रिय नसणारे बीचेस आहेत. या ठिकाणी न्यूडिस्ट लोक आढळतात. परंतु हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की, भारतात सार्वजनिक नग्नता बेकायदेशीर आहे. म्हणून आपणास जरी अशा बीचवर कपडे काढण्याची इच्छा झालीच तर कदाचित आपल्याला शिक्षा होऊ शकते.