Holi 2020: होळीच्या सणासाठी जवळजवळ सर्व महत्वाच्या ट्रेन्स फुल्ल; जाणून घ्या सध्याच्या जागांची उपलब्धता

होळीच्या आठवडाभरापूर्वी आणि नंतर दिल्ली ते गोरखपूर येणाऱ्या जाणाऱ्या वैशाली, गोरखधाम, संपर्कक्रांती व सप्तक्रांती एक्स्प्रेसमधील सीट्स आतापासून फुल्ल व्हायला सुरुवात झाली आहे

Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

येत्या 10 मार्च रोजी देशभरात होळीचा (Holi) उत्सव साजरा होणार आहे. याकाळात अनेक लोक सुट्टी घेऊन फिरायला जातात अथवा बाहेरील लोक आपापल्या घरी परततात. अशात ट्रेनमधील (Train) जागेच्या उपलब्धतेबाबत स्थिती थोडी अवघड आहे. होळीच्या आठवडाभरापूर्वी आणि नंतर दिल्ली ते गोरखपूर येणाऱ्या जाणाऱ्या वैशाली, गोरखधाम, संपर्कक्रांती व सप्तक्रांती एक्स्प्रेसमधील सीट्स आतापासून फुल्ल व्हायला सुरुवात झाली आहे. या गाड्यांच्या कोणत्याही वर्गात जागा उपलब्ध नाहीत. ही परिस्थिती गोरखपूरहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये 16 मार्चपर्यंत आहे.

4 ते 9 मार्च दरम्यान दिल्ली आणि मुंबईहून गोरखपूरकडे जाणाऱ्या कोणत्याही गाडीत जागा उपलब्ध नाही. 11 ते 16 मार्च दरम्यान दिल्ली आणि मुंबईला जाणाऱ्या गाड्यांमध्येही जागा नाही. या महत्वाच्या ट्रेनमध्ये जागा नसली तरी, नुकत्याच सुरू झालेल्या हमसफर एक्स्प्रेसमध्ये आरक्षण करून आपण आपला प्रवास आनंददायक बनवू शकता. त्यात गोरखपूर ते दिल्ली आणि दिल्ली ते गोरखपूर अशा जागा उपलब्ध आहेत.

या गाड्यांमध्ये वेटिंग तिकिटे उपलब्ध आहेत (वेटिंग शंभरहून अधिक आहे) -

जयनगरहून शहीद एक्स्प्रेस, हावडा जाणारी हिमगिरी एक्सप्रेस, भागलपूरला जाणारी अमरनाथ एक्स्प्रेस, हावडा जाणारी दून एक्स्प्रेस, सियालदहला जाणारी अकाल तख्त एक्स्प्रेस

या गाड्यांमध्ये सीट्स उपलब्ध असण्याची शक्यता -

कटरा-कामाख्या एक्स्प्रेस, भगतची कोठी-कामाख्या एक्सप्रेस, जम्मूतवी-कानपूर एक्सप्रेस, चंडीगड-लखनऊ एक्सप्रेस, आनंद विहार-कामाख्या एक्सप्रेस, दिल्ली-छपरा एक्सप्रेस, दिल्ली-सियालदाह एक्सप्रेस. (हेही वाचा: भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करणार?)

विशेष ट्रेन चालवण्याची तयारी -

होळीच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने होळी विशेष गाडी चालवण्याची व्यवस्था सुरू केली आहे. विशेष गाड्या फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील. या गाड्या लखनऊ, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, चंदीगड, अंबाला, अमृतसर येथे धावतील. यावर्षीही होळीच्या उत्सवासाठी दरवर्षीपेक्षा जास्त विशेष गाड्या चालविण्यात येतील, असे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रेखा शर्मा यांनी सांगितले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now