जिलेबी, गुलाबजाम, इडली यांसारखे अनेक पदार्थ भारतीय नाहीत; जाणून घ्या नक्की कुठून आले हे पदार्थ

भारताच्या हवेत, सुगंधात, संस्कृतीत मिसळून गेलेले गुलाबजाम, इडली, राजमा, बिर्याणी असे अनेक पदार्थ आहेत जे भारतीय नाहीत

गुलाबजाम (Photo credit : you tube)

भारतात अनेक पदार्थ पारंपरिक पदार्थ म्हणून ओळखले जातात, तर काही पदार्थ बाहेरून आले आणि आता ते इंग्लिश पदार्थ म्हणून आपण स्वीकारलेही. या व्यतिरिक्त भारतात असे अनेक पदार्थ आहेत जे आपण लहानपणापासून अगदी चवीने खात आलो आहोत. उदा- गुलाबजाम, इडली, राजमा, बिर्याणी इत्यादी. मात्र जर का तुम्हाला कोणी सांगितले की हे पदार्थ भारतीय नाहीत, तर ? विश्वास बसत नाही ना? पण हे खरे आहे. भारताच्या हवेत, सुगंधात, संस्कृतीत मिसळून गेलेले असे अनेक पदार्थ आहेत जे भारतीय नाहीत. चला तर पाहूया कोणते आहेत हे अभारतीय पदार्थ जे आपण चवीने भारतीय म्हणून खात आहोत.

जिलेबी - गरमागरम जिलेबीचे नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटते. बाहेरून विकत आणण्याऐवजी आजकाल घरातही जिलेबी तयार केली जाते. काही ठिकाणी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी अशा दिवशी तर हमखास जिलेबी खाल्ली जाते. मात्र तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, जिलेबी हा पदार्थ भारतीय नाही. जिलेबी हा पदार्थ मुळचा आहे अरब देशातला. फारसी लोक हा पदार्थ भारतात घेऊन आले. अरेबिकमध्ये याला झिलबिया असे म्हटले जाते.

फिल्टर कॉफी – दक्षिण भारतीय प्रत्येक घरामध्ये, आणि आता इतरही ठिकाणी अगदी अमृतासारखी प्यायला जाणारी फिल्टर कॉफी ही आली आहे येमन या देशामधून. सुफी संत बाबा बुदान हे कॉफीच्या बिया भारतात घेऊन आले होते.

गुलाबजाम -जेवणानंतर स्वीटडिश म्हणून गुलाबजाम हा पदार्थ हमखास खाल्ला जातो. मात्र हा गुलाबजाम फारसी लोक भारतात घेऊन आले. फारसी मध्ये गुल म्हणजे फुल तर अब म्हणजे पाणी. फारसी देशांमध्ये गुलाबजामला 'लोकमा' आणि 'लुक्मत-अल-कादी' असे म्हटले जाते.

डाळ–भात (खिचडी) - भारतातील प्रत्येक घरात बनणारा आणि जवळजवळ प्रत्येकाच्या आवडीचा कामचलाऊ पदार्थ म्हणजे खिचडी. खास करून उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये लोकप्रिय असलेली ही डाळ खिचडी आली आहे नेपाळमधून.

राजमा – प्रत्येक पंजाबी घरात हमखास बनणारा पदार्थ म्हणजे राजमा चावल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हा राजमा भारतात आला आहे तो पोर्तुगालमधून. आणि राजमा बनवण्याची रेसिपी आली आहे ती मेक्सिको इथून.

सामोसा - भारतातील अनेक ठिकाणी अगदी सहज मिळणारा समोसा हा भारतीय नसून तो मध्य पूर्व देशांमधून आला आहे. मध्य पूर्व देशांमध्ये 'सम्बोसा' या नावाने समोसा ओळखला जातो. 10 शतकाच्या आधीपासून उपलब्ध असणारा हा पदार्थ 14 व्या शतकात मध्य आशियात आला.

बिर्याणी - बिर्याणी पाहिल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. भारतातील हैदराबादी बिर्याणी खूपच प्रसिद्ध आहे. मात्र बिर्याणी तुर्कचा पारंपारिक पदार्थ असून तुर्की व्यापाऱ्यांसोबत हा पदार्थ भारतात आला.

इडली - नाश्तामध्ये प्रसिद्ध असलेली इडली साऊथ इंडियामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र इडली ही भारतीय नसून अरब देशातून जलमार्गाने भारतात आली आहे. त्यामुळेच साऊथ इंडियाच्या सागरी भागात ती सर्वात आधी लोकप्रिय झाली. त्यानंतर आता संपूर्ण भारतात इडली प्रसिद्ध आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif