Monsoon Health Tips for Kids: पावसाळ्यात मुले निरोगी राहतील, 'घ्या' अशी काळजी

या दिवसांत मुलांना व्हायरल संसर्गाचा धोका जाणवतो. त्यामुळे लहान मुलांची योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.

Children Health Tips PC PIXABAY

Monsoon Health Tips for Kids: पावसाळा सुरु झाला की, पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याची चिंता वाढू लागते. या दिवसांत मुलांना व्हायरल संसर्गाचा धोका जाणवतो. त्यामुळे लहान मुलांची योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. मुलांना व्हायरल संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी पुढील टीप्स दिल्या आहेत, जाणून द्या (हेही वाचा-मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी करा 'हे' उपाय)

१. स्वच्छतेची काळजी घ्या

पावसाळ्यात संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छता राखणे सर्वात महत्त्वाची बाब ठरते. त्यामुळे आपल्या मुलांना पावसाळ्याच्या दिवसात गरम पाण्याने दिवसातून दोन वेळा अंघोळ करायाला सांगा. मुलांना नियमितपणे हात पाय धुण्याची सवय लावा. विशेषत: जेवणापूर्वी आणि बाहेरून आल्यावर. घर स्वच्छ ठेवा. मुलांना वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यायला सांगा.

२. पोषणयुक्त आहार

मुलांच्या आहारात ताज्या फळे, भाज्या द्या. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी याकरीत प्रोटीन्स आणि मिनरल्सचयुक्त भाज्याचा आहारात समावेश करा. मुलांना या दिवसांत गरम पाणी प्यायला द्या.

३. व्हॅक्सीनेशन

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुलांचे लसीकरण वेळेवर करा. मुलांच्या आरोग्य तपासणी करून घ्या. ज्यामुळे व्हायरल संसर्ग दुर राहील. मुलांना डास प्रतिबंधक क्रीम किंवा लोशन लावा. या दिवसांत मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे हे पालकांसाठी महत्त्वाकांक्षी ठरू शकते.

४. सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहा

पावसाच्या दिवसांत मुलांना चिखलात किंवा ओल्या ग्राऊंडवर खेळणे आवडीचे वाटते. त्यामुळे व्हायरल होण्याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा. शक्य असल्यास मुलांना घरातच खेळण्यास प्रवृत्त करा.

पावसाळ्यात मुलांची काळजी घेणे हे मानसिक आणि शारिरिक आरोग्यासाठी आवश्यक ठरते. या टीप्सच्या मदतीने आपल्या मुलांना व्हायरल संसर्गापासून सुरक्षित ठेवा. मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतत जागरुक राहा.