धुम्रपानामुळे तणाव आणि सिझोफ्रेनिया आजाराचा वाढतो धोका!

नुकत्याच धुम्रपानाबाबत करण्यात आलेल्या एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, ज्या व्यक्ती दररोज धुम्रपान करतात त्यांच्यामध्ये तणाव (Tension) आणि सिझोफ्रेनिया (Schizophrenia) सारखा गंभीर आजार होण्याचा धोका अधिक वाढतो.

Smoking (Photo Credits-Facebook)

जर तुम्हाला धुम्रपान करत असल्यास ही सवय तुम्ही लवकरच सोडून द्या. कारण धुम्रपानामुळे आरोग्यावर परिणाम होऊन गंभीर आजार होण्याची शक्यता फार असते. त्यामुळे धुम्रपान करण्याचा सवयीवर आळा घालणे फार महत्वाचे आहे. नुकत्याच धुम्रपानाबाबत करण्यात आलेल्या एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, ज्या व्यक्ती दररोज धुम्रपान करतात त्यांच्यामध्ये तणाव (Tension) आणि सिझोफ्रेनिया (Schizophrenia)  सारखा गंभीर आजार होण्याचा धोका अधिक वाढतो.

धुम्रपानाबाबत करण्यात आलेल्या अभ्यासाचे मुख्य ऑथर रॉबिन वूटन यांच्या मते, मानसिक आजारांचा सामना करण्याऱ्या व्यक्तींवर उपचार करतानाच आम्ही त्यांच्या धुम्रपान आणि तंबाखू सेवनाच्या सवयीकडे दुर्लक्ष करतो. कारण आमच्या अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की, धुम्रपानामुळे तणाव सिझोफ्रेनिया सारख्या मानसिक आजारासंबंधिक समस्या अधिक वाढतात.

वूटन यांनी असे ही म्हटले आहे की, अभ्यासातून असे ही सिद्ध झाले आहे की शारिरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यासंबंधित समस्यांपासून दूर राहण्यासाठी धुम्रपान सारख्या गोष्टींपासून दूर रहाणे उत्तम पर्याय आहे. धुम्रपानामुळे होणाऱ्या समस्यांबाबत जनजागृती करणे अत्यंत महत्वाचे आहे. या संशोधनाच्या संदर्भात जोडण्यात आलेली दुसऱ्या रिसर्च टीमने युरोप मधील 462,690 लोकांची माहिती जमा केली. त्यामध्ये 8 टक्के लोक धुम्रपान करतात. तर 22 टक्के लोकांनी धुम्रपानाची सवय सोडून दिली आहे.(Lung Cancer Awareness Month : फळे, भाज्या खा ; फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका टाळा)

तसेच तंबाखू सारख्या घातक पदार्थावर सरकारने बंदी आणलेली असूनही अजूनही ह्या तंबाखूचे व्यसनापासून लोक मुक्त झालेली नाही. काहींच्या आयुष्यात तर हा अविभाज्य घटकच बनला आहे. मात्र ह्या तंबाखूमुळे होणारे आजारांची भीषणता जर आपल्याला कळली तर त्याने एखाद्याचे आयुष्यही संपू शकते ही गोष्टच मुळी लोकांना पटत नाही. तंबाखूच्या सेवनाने 'सीओपीडी' (COPD) यासारखा एक गंभीर आजार आता डोकं वर काढू लागलाय.