Cigarette Smoking: आठवड्याला 400 सिगारेट ओढणे ब्रिटनमध्ये किशोरवयीन मुलीच्या जीवावर बेतले; फुफ्फुस बंद पडले, साडेपाच तासांची शस्त्रक्रिया करावी लागली

आठवड्यात तब्बल 400 सिगारेट्सच सेवन केल्याने युकेमध्ये किशोरवयीन मुलीचे फुफ्फुस बंद पडले. त्याशिवाय, तिच्या फुफ्फुसात छिद्र देखील पडले होते. सध्या तिची प्रकृती ठिक असून तिच्यावर 5 तासांची मोठी शस्त्रक्रिया पार पडली.

Photo Credit - Pixabay

Cigarette Smoking: सिगारेटच (Cigarette)अतिसेवन ब्रिटनमध्ये एका 17 वर्षीय किशोरवयीन मुलीच्या जीवावर बेतलं आहे. एका आठवड्यात तब्बल 400 सिगारेट्सच सेवन केल्याने किशोरवयीन मुलीचे फुफ्फुस बंद(Lung Collapses) पडले. त्याशिवाय, तिच्या फुफ्फुसात छिद्र देखील पडले होते. सध्या तिची प्रकृती ठिक असून तिच्यावर 5 तासांची मोठी शस्त्रक्रिया पार पडली. त्याकाळात तिला हृदयविकाराचा झटका आल्याचेही तिच्या वडीलांनी सांगितले आहे. कायला ब्लिथ असे त्या 17 वर्षीय किशोरवयीन(teens vaping) मुलीचे नाव आहे. 11 मे रोजी रात्री मित्राच्या घरी असताना कायला अचानक कोसळली. तिच्या त्वचेचा रंग निळाशार झाला होता. तिला रुग्णालयात दाखल केले असता. डॉक्टरांना वैद्यकीय तपासणीदरम्यान, तिच्या फुफ्फुसातील ब्लेब नावाचा भाग खराब झाल्याचे आढळले. (हेही वाचा:Girl Dies After Eating Pizza: काय सांगता? पिझ्झा खाल्ल्याने 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; जाणून घ्या काय घडले)

सिगारेटच्या अतिसेवनाने तिच्या फुफ्फुसातील ब्लेब म्हणून ओळखला जाणारा एक लहान वायु फोड फुटला होता. त्यानंतर ब्लिथच्या फुफ्फुसाचा काही भाग काढण्यासाठी साडेपाच तासांची शस्त्रक्रिया करावी लागली. कायलाचे वडील मार्क ब्लिथ यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की,'त्यांच्यासाठी हे भयानक होते. शस्त्रक्रियेनंतर ते पूर्ण वेळ कायलासोबत आहेत. सिगारेटचे अतीसेवन त्यांच्या मुलीसाठी जीवघेणे ठरले. तिला हृदयविकाराचा झटका आला. काही काळ त्यांनी त्यांच्या मुलीला गमावले असे वाटले.''

कायला हिने तिच्या मित्रांना पाहून वयाच्या 15 व्या वर्षी सिगारेटचे सेवन केरण्यास सुरूवात केली होती. कालांतराने तिचे सिगरेटचे व्यसन एवढे वाढले की आठवड्याला 400 सिगरेट संपवायची. सुरूवातीला हे फक्त टाईमपासचे साधन वाटायचे. सिगारेटचा तिच्या शरिरावर काही वाईट परिणाम होणार नाही या मताची ती होती. तिने अनेकांना खूप सिगरेट ओढताना पाहिले होते . सिगेरच्या व्यसनाचा त्यांच्या शरिरावर काही परिणाम देखली झाला नव्हता. मात्र, तिच्यावर ओढावलेल्या परिस्थीतीनंतर तिने ती घाबरली आहे.

ॲक्शन ऑन स्मोकिंग अँड हेल्थ (एएसएच) नुसार, किशोरवयीन मुलांमध्ये सिगारेटची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. 2023 मध्ये तर या ट्रेंडमध्ये त्यांनी जवळपास 20% वाढ अनुभवली. एक चिंताजनकबाब म्हणजे, 5 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले देखील सिगारेट व्यसनाधीन होत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now