Shiv Jayanti 2020: शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा नेमका अर्थ काय? वाचा सविस्तर
केवळ राजमुद्रेवर कोरलेल्या अक्षरांतून व्यक्त होणाऱ्या संदेशाचा जरी विचार केला तरी, छत्रपती शिवरायांचे बौद्धीक सामर्थ सहज ध्यानात येते. केवळ सात शब्दांमध्ये त्यांनी गहण अर्थ सांगितला आहे. आजही इतिहास संशोधक, अभ्यासक, राज्य कारभार करणारी मंडळी आणि असंख्य शिवप्रेमींना शिवाजी महाराज यांची राजमुद्रा प्रेरणा देते. विचारप्रवर्तक बनवते.
Marathi And English Meaning Of Chatrapati Shivaji Maharaj Rajmudra: महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj Jayanti 2020) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात शिवजयंती साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात सुट्टी जाहीर केली जाते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी दिलेले योगदान अनेकांच्या लक्षात यावे, यासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम राबवले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि गनिमी युक्तीने बलाढ्य माराठा सम्राज्य निर्माण केले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरिपेक्ष राजा होते. त्यांचा जात-पातला विरोध असून त्यांच्या सैन्यात अनेक जाती, धर्माचे लोक कार्यरत होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. याशिवाय राज्यातील विविध ठिकाणी त्यांचे पुतळेही स्थापित करण्यात आले आहेत. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा नेमका अर्थ काय? याची अनेकांना माहिती नसते. अशा लोाकांसाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.
शिवरायांच्या राजमुद्रेचा अर्थ-
प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।
ही अक्षरे शिवरायांच्या राजमुद्रेवर झळकतात. ही केवळ अक्षरे नाहीत तर, हा एक विचार आणि महत्वाचा संदेश आहे. इतिहासाच्या अभ्यासकांनी सांगितलेला शिवरायांच्या राजमुद्रेवरील अर्थ असा की, ‘प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’. हे देखील वाचा- Shiv Jayanti 2020: शिवाजी महाराजांच्या नावामागे होती देवी शिवाई यांची प्रेरणा; Video च्या माध्यमातून जाणून घ्या काही खास गोष्टी!
शिवरायांच्या राजमुद्रेचा इंग्रजी अर्थ
The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji (Maharaj ) will grow like the first day moon .It will be worshiped by the world & it will shine only for well being of people.
शिवजयंतीच्या शुभेच्छा द्या व्हिडिओच्या माध्यमातून-
केवळ राजमुद्रेवर कोरलेल्या अक्षरांतून व्यक्त होणाऱ्या संदेशाचा जरी विचार केला तरी, छत्रपती शिवरायांचे बौद्धीक सामर्थ सहज ध्यानात येते. केवळ सात शब्दांमध्ये त्यांनी गहण अर्थ सांगितला आहे. आजही इतिहास संशोधक, अभ्यासक, राज्य कारभार करणारी मंडळी आणि असंख्य शिवप्रेमींना शिवाजी महाराज यांची राजमुद्रा प्रेरणा देते. विचारप्रवर्तक बनवते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)