Sexual Health Awareness: किस केल्याने होऊ शकतो एसटीडी हा गंभीर आजार, वेळीच ओळखा, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

होय चुंबन हा नातेसंबंधातील सर्वात रोमांचक भागांपैकी एक असूनही, आपण आपल्या जोडीदाराशी संबंध ठेवतांना खूप सावधगिरी बाळगणेही खूप आवश्यक आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Kiss | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

Sexual Health Awareness: किस केल्याने एसटीडी हा गंभीर आजार होऊ शकतो. होय चुंबन हा नातेसंबंधातील सर्वात रोमांचक भागांपैकी एक असूनही, आपण आपल्या जोडीदाराशी संबंध ठेवतांना खूप सावधगिरी बाळगणेही खूप आवश्यक आहे. कारण किस केल्यामुळे नागीण आणि सायटोमेगॅलव्हायरस आणि   सिफिलीस सारखे गंभीर होऊ शकतात. तथापि, असे गंभीर आजार टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, तुमच्या जोडीदाराशी STD या आजारा विषयी, किस केल्याने होणाऱ्या गंभीर बाबींबद्दल मोकळेपणाने संभाषण करणे गरजेचे आहे. [हे देखील वाचा: Happy World Coconut Day 2022: कोकोनट डे च्या शुभेच्छा देण्यासाठी Quotes, HD Images, WhatsApp Messages!]

चुंबनामुळे होणारे STD हा आजार काय आहे?

नागीण: HSV1 हा आजार  सहसा चुंबनामुळे होतो. नागीण झाल्यास तोंडात किंवा जननेंद्रियाच्या भागात लहान पांढरे फोड येतात. 

HSV2 : हा आजार सामान्यतः जननेंद्रियांवर परिणाम करतो कारण हा आजार केवळ लैंगिक संपर्काद्वारे पसरते. हे दोन्ही विषाणू रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतात

सायटोमेगॅलव्हायरस: हा संसर्ग सामान्यतः लाळेमुळे पसरतो. त्याशिवाय संभोगातूनही पसरतो. सायटोमेगॅलॉइरसमुळे अत्यंत थकवा, ताप, घसा खवखवणे आणि शरीरात वेदना होतात. या आजारावर कोणताही इलाज नाही आणि हा आजार कमीत कमी एका आठवड्यानंतर बरा होतो.

सिफिलीस: हा एक जिवाणू संसर्ग आहे. हा आजार झालायस तोंडात फोड येतात. चुंबन हे सिफिलीसच्या प्रसाराचे मुख्य कारण आहे,  सिफिलीसमुळे ताप आणि डोकेदुखी होते, तसेच लिम्फ नोड्सवर सूज येणे, थकवा, दृष्टी कमी होणे, मेंदूचे नुकसान, मानसिक आरोग्य स्थिती बिघडणे, टक्कल पडणे आणि स्मृती कमी होते.

जोडीदाराला काय सांगाल ?

 एसटीडी हे संक्रमण नसून वंध्यत्वासारख्या इतर अंतर्निहित परिस्थितींना कारणीभूत ठरू शकतात. म्हणूनच, तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून तुमच्या दोघांनाही असा कोणताही आजार होण्याचा धोका राहणार नाही. 

प्रामाणिक आणि थेट बोला : तुमच्या जोडीदाराशी बोलण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या समस्या आणि समस्यांबद्दल मोकळे, प्रामाणिक आणि थेट बोलणे.

अडथळे: चुंबनाद्वारे विषाणू आणि बॅक्टेरिया पसरत असल्यास,उपाययोजना म्हणून dental dams वापरा, ब्रश नीट करा, चांगल्या पेस्टचा वापर करा. 

समजूतदार व्हा: जर तुम्हाला चुंबन घेतल्यामुळे कोणताही आजार झाला तर तुमच्या जोडीदारावर रागावण्याची गरज नाही. त्याऐवजी, उपाय शोधा. आणि तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा. [लेखात नमूद केलेल्या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिल्या आहेत.]